होय ! कोरोनामुळे लग्नाळू शेतकरी मुलांचे ‘भाव’ वाढले …

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,8 जून 2020 :  कोरोनाचे संकट जगाला आपत्ती ठरत असले तरी लग्न लग्नाच्या फेऱ्यात न अडकलेल्या शेतकरी व व्यावसायिक मुलांना मात्र या काळात अचानक पसंती वाढली आहे.

गेल्या दोन महिन्यात लग्न न जुळणाऱ्या शेतकरी मुलांना कोरोना ही इष्टापत्ती ठरली आहे. विशेष म्हणजे लॉकड़ाऊनच्या काळात मोठ्या संख्येने हे विवाह उरकले आहेत.

त्यामुळे आता नोकरदार ऐवजी शेतकरी मुलांचे ‘भाव वाढले’ आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. एकटया अकोले तालक्यात लॉकडाऊनच्या काळात जवळपास ५० शेतकरी मुलांचे विवाह झाले आहेत.

गेल्या काही वर्षांपासून नोकरीवाला व शहरातील नवरदेव शोधण्यासाठी पालकांनी आटापिटा केला. यात लग्न जमवणाऱ्या एजंटांची मोठी कमाई होत असल्याने शेतकरी व व्यावसायिक मुलांची लग्न होणे कठीण झाले होते.

दरम्यान कोरोनाच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने शेतकरी मुलांच्या लग्नाचा आकडा वाढला आहे यामुळे कोरोनाच्या संकटामुळे का होईना पण लग्नाळू शेतकरी मुलांचे ‘भाव’ वाढले आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24