होय ! मालकाचे प्राण वाचविण्यासाठी कुत्र्याने केली वाघाची शिकार….

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :-  संगमनेर तालुक्यातील वाघापुर गावात कुत्र्याने चक्क वाघाचा पाठलाग केल्याची अजब व आश्चर्यचकीत प्रकार पहायला मिळाला.

संगमनेर शहरालगत असणार्‍या वाघापूर येथे गव्हाळी वस्तीवर अण्णासाहेब लहानू शिंदे यांच्या घराजवळ सकाळच्या सुमारास बिबट्याचे बछडे निदर्शनास आले.

त्याक्षणी घरातील कुत्र्याने त्या बछड्याचा पाठलाग केला. आणि बछडे सरासर शेवरीच्या झाडावर चढले. हे कुत्रे त्या शेवरीजवळ जावून झाडावर असणार्‍या वाघावर भुंकत राहिले. त्यांच्यातील हा प्रकार जवळजवळ अर्धातास चालु होता.

मालकाबरोबर शेतात गेलेल्या कुत्र्याला अघटिताची चाहूल लागली. बिबट्याच्या रूपानं काळच त्यांच्यावर झडप घालणार होता. मृत्यू समोर दिसत असूनही कुत्रा डगमगला नाही. त्याने चक्क बिबट्यावर हल्ला चढवला.

शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास वाघापूर येथील शेतकरी अण्णासाहेब रघुनाथ शिंदे हे शेतात चारा आणण्यासाठी गेले होते.

नेहमीप्रमाणे त्यांच्याबरोबर पाळीव कुत्राही होता. थोड्या वेळाने त्यांना कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला. प्रथम त्यांनी दुर्लक्ष केले. मात्र, सातत्याने भुंकणाऱ्या कुत्र्यामुळे त्यांची उत्सुकता चाळवली. त्यांनी शोध घेतला तर त्यांचा कुत्रा बिबट्याशी लढत होता.

आक्रमणामुळे त्रस्त झालेल्या बिबट्याने शेताच्या बांधावरील शेवरीच्या झाडावर आश्रय घेतला. कुत्रा पायथ्याशी उभा राहून भुंकत त्याच्यावर चाल करत होता.

हे दृष्य पाहून शिंदे यांनी शेजाऱ्यांना आवाज दिल्याने गर्दी जमा झाली. खाली उतरल्यावर बिबट्या कुत्र्याचा फडशा पाडणार असे सर्वांना वाटत होते. सुमारे अर्ध्या तासाने बिबट्या वैतागला.

कशीबशी खाली उडी मारुन त्याने तेथून पलायन केले. कुत्र्याने बराच अंतरापर्यंत पाठलाग करत त्याला पिटाळून लावलं. कुत्र्याच्या या शौर्याची चर्चा वाघापुरात दिवसभर सुरू होती.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

अहमदनगर लाईव्ह 24