कारखान्याबाबत सहकार विभागाचा ‘ हा’ महत्वपूर्ण निर्णय ; अहमदनगर जिल्ह्यातील ‘ही’ कारखाने समाविष्ट

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- सन 2014 मध्ये गाळप घेतलेल्या कारखान्यांना ऊस पुरविणार्‍या शेतकर्‍यांना एफआरपीची रक्कम अदा करण्यासाठी मदत व्हावी यासाठी दीर्घ मुदतीच्या कर्जावर व्याज अनुदान देण्याबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे.

सन 2017-18मधील प्रपत्र अ मध्ये नमूद केल्याप्रमाणे राज्यातील 54 सहकारी साखर कारखान्यांना उर्वरित तेवीस कोटी त्रेचाळीस लाख तेरा हजार एकशे नव्वद इतकी देय रक्कम सन 2020-21 मध्ये उपलब्ध असलेल्या तरतुदीमधून अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यात नगर जिल्हयातील अनेक साखर कारखान्यांचा समावेश आहे.

अहमदनगर जिल्हयातील ह्या कारखान्यांचा समावेश :- श्रीरामपुरातील अशोक, कोपरगावातील कर्मवीर शंकररावजी काळे सहकारी साखर कारखाना, अकोलेतील अगस्ति, नेवाशातील मुळा, ज्ञानेश्‍वर, संगमनेरातील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात, श्रीगोंदयातील कुकडी, सहकार महर्षि शिवाजीराव नागवडे आणि पाथर्डीतील वृध्देश्‍वर कारखान्याचा समावेश आहे.

कोणाची किती रक्कम ? :-अशोक कारखान्याची पात्र व्याज अनुदाची रक्कम 1 कोटी 24 लाख 84 हजार आहे. उर्वरित प्रस्तावित रक्कम 49 लाख 31 लाख 253 रूपये, कर्मवीर शंकरराव काळे कारखाना 40 लाख 23 हजार 20 रूपये, वृध्देश्‍वर-13 लाख 60 हजार 438 रूपये,

नागवडे 35 लाख 94 हजार 101, कुकडी 37 लाख 15 हजार 140, ज्ञानेश्‍वर 53 लाख, 55 हजार 800, मुळा 59, 22 145, सहकार महर्षि भाऊसाहेब थोरात कारखाना 71 लाख 86 हजार 516, नागवडे कारखाना 35लाख 94 हजार 101.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24