अहमदनगर सीए शाखेतर्फे योग दिन साजरा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिन अहमदनगर सीए शाखा, पतंजली योग समिती व नक्षत्र प्राणायाम ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने नक्षत्र लौन्स, बुरूडगाव रोड येथे उत्साहाने साजरा करण्यात आला.

सकाळी ६ ते ८ ह्या वेळेत चाललेल्या योग शिबिरात प्रथम पतंजली योग समितीचे श्री अविनाश ठोकळ यांनी मार्गदर्शन केले.

त्यामध्ये त्यांनी पूरक हालचाली, सूर्य नमस्कार व प्राणायामाचे विविध प्रकार करून घेतले.

७ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांचे योग दिनाविषयिचे विशेष भाषणाचे थेट प्रक्षेपण ही ह्या वेळेस दाखविण्यात आले.

तसेच सीए संस्थेचे प्रेसिडेंट सीए प्रफुल्ल छाजेड व व्हाईस प्रेसिडेंट सीए अतुल गुपता यांनी वीदिओ द्वारे दिलेल्या संदेशाचे प्रक्षेपण यावेळी करण्यात आले.

सुरुवातीला अहमदनगर सीए शाखेचे अध्यक्ष सीए (डॉ) परेश बोरा यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रथम महापौर भगवान फुलसौंदर यांनी यावेळेस मनोगत व्यक्त केले.

तर उपाध्यक्ष सीए किरण भंडारी ह्यांनी आभार मानले. सदर शिबिरासाठी सीए संदीप देसरडा, ज्ञानेश्वर काळे, सीए पवन दरक, सीए सुशील जैन, व इतर सीए सभासद, तसेच विकासा चे विद्यार्थी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24