अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :- संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे गावानजीक चिंचोली रस्त्याच्या कडेला असलेल्या गवतास गुरुवारी (दि. २८) दुपारी १२.१५ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत हजारो वृक्षरोपे जळून खाक झाली.
सुमारे पाच एकर क्षेत्रातील नवीन लागवड केलेले जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. दुपारी दीड वाजेच्या सुमारास थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशामक बंबाने पाणी मारून आग विझविली. तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे गावानजीक चिंचोली रस्त्याच्या कडेला असलेल्या गवतास गुरुवारी (दि. २८) दुपारी १२.१५ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली.
या आगीत हजारो वृक्षरोपे जळून खाक झाली. सुमारे पाच एकर क्षेत्रातील नवीन लागवड केलेले जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. दुपारी दीड वाजेच्या सुमारास थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशामक बंबाने पाणी मारून आग विझविली. तळेगाव दिघे गावाच्या पश्चिमेला गायरान क्षेत्रात सुमारे पाच एकरहून अधिक क्षेत्रात वनविभागामार्फत विविध वृक्ष रोपांची लागवड करण्यात आलेली होती.
यंदा पाऊस चांगला झाल्याने वृक्षरोपे बहरू लागली होती. गुरुवारी दुपारी १२.१५ वाजेच्या सुमारास जंगलास अचानक आग लागली. वाळलेल्या गवतामुळे आगीने जोरात पेट घेतला. थोड्याच वेळात आगीने जंगलाचा मोठा परिसर व्यापला. याबाबत माहिती मिळताच सरपंच बाबासाहेब कांदळकर, मतीन शेख, अमोल दिघे, अनिल दिघे आदींनी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र यश आले नाही.
स्थानिकांनी संगमनेर येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशामक यंत्रणेस याबाबत माहिती दिली. त्यानंतर तातडीने थोरात साखर कारखान्याचा अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाला. बंबाने पाण्याचे जोराचे फवारे मारून आग आटोक्यात आणली. या जंगलास आग कशामुळे लागली, याचे निश्चित कारण मात्र समजू शकले नाही.