युवा पिढीने सामाजिक प्रश्न सोडविण्यास सहकार्य करावे : आ. संग्राम जगताप

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- महिलांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे पाणी. यासाठी कायमस्वरुपी पाण्याचा प्रशन मार्गी लागावा म्हणून तपोवन रोडवरील एसटी कॉलनीतील विघ्नहर्ता महिला मंडळास पाण्याची टाकी भेट दिली आहे.

या माध्यमातून नियमित पाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. आजच्या युवा पिढीने पुढे येऊन सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले पाहिजे. समाजामध्ये नागरिकांचे छोटछोटे प्रश्न आहे.

ते सोडविण्यासाठी पुढे यावे. आपल्या परिसरामधीलच अडचणींचा मागोवा घेऊन ते सोडविण्यासाठी प्रयत्न करावे. शासनाच्या विविध योजना प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचविण्याचे काम करावे.

राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे सचिव तनवीर मनियार हे वर्षभर सामाजिक बांधिलकी म्हणून विविध उपक्रम साजरे करत असतात, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.

तपोवन रोडवरील एसटी कॉलनीतील विघ्नहर्ता महिला मंडळास पाण्याची टाकी भेट देताना आ. संग्राम जगताप, नगरसेवक गणेश भोसले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे, सचिव तनवीर मनियार,

जिल्हा उपाध्यक्ष संतोष ढाकणे, सज्ञाद बागवान, संदीप वाघमारे, पवन काळे, संगिता बारवेकर, शोभा गाडे, ज्योती काळे, जया दरंदले आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मनियार म्हणाले की, दैनंदिन जीवनामध्ये आपल्याच परिसरातल विविध प्रश्न प्रलंबित आहेत. ते सोडविण्यासाठी नागरिकांना पर्याय माहित नसल्याने अनेक प्रश्न प्रलंबित राहतात.

यासाठी आम्ही आ. संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली या परिसरामध्ये नागरिकांचे विविध प्रश्न सोडविण्याचे काम करत आहोत. या पुढील काळात प्रलंबित प्रश्‍नही मार्गी लावू, असे ते म्हणाले.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24