अहमदनगर Live24 ,9 मे 2020 :- राहुरी तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनेत तरुणीने गळफास तर तरुणाने रेल्वेखाली आत्महत्या करण्याच्या घटना घडल्या.
पहिली घटना राहुरी तालुक्यातील गुहा येथे राहणारी तरुणी प्राजक्त अविनाश ओहोळ हिने रहात्या घरात अँगलला ओढणीच्या साह्याने गळफास घेवून आत्महत्या केली .
ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी तशी खबर राहरी पोलिसात दिल्यावरुन अमनं . ४५ नोंदविण्यात आला. पोनि देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली . सपोनि राक्षे हे पुढील तपास करीत आहेत . दु
सऱ्या घटनेत राहरी तालुक्यातील धामोरी परिसरात सागर तुकाराम येवले , वय २४ रा . मोकळओहळ , ता . राहरी याने रेल्वेखाली आत्महत्या केली .
तशी खबर धामोरीचे पोलीस पाटील खंडू रावण जाधव यांनी राहरी पोलिसात दिल्यावरुन पोलिसांनी अमनं . ४६ नोंदविला असून घटनास्थळी पोनि देशमुख यांनी भेट दिली .
हेकॉतपे हे पुढील तपास करीत आहेत . दोन वेगवेगळ्या घटनेत एक तरुणी व तरुणाचा अकस्मात मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®