उसणे दिलेले चार लाख न मिळाल्याने तरूणाची विष पिऊन आत्महत्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :-  तरूणाने विषारी औषध घेत आत्महत्या केली. गणेश कोंंडिबा कोतकर (रा. कोतकर वस्ती, निंबळक ता. नगर) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.

उसणे दिलेले चार लाख परत न मिळाल्याने गणेशने डिप्रेशन खाली जाऊन जीवन संपविले. दरम्यान चार लाख घेतलेल्या व्यक्तीविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाळू ऊर्फ बाळासाहेब जगन्नाथ कोतकर (रा. निंबळक ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. मयत गणेश कोतकर यांचा भाऊ संदीप कोंडिबा कोतकर यांनी फिर्याद दिली आहे.

गणेश कोतकर यांनी बाळू कोतकर याला मागील सहा ते सात महिन्यापूर्वी हात उसणे चार लाख रूपये दिले होते. गणेश यांनी बाळूकडे चार लाख रूपयांची वेळोवेळी मागणी करून देखील त्याने ते पैसे दिले नाही.

त्यामुळे गणेश हा डिप्रेशनमध्ये गेला होता. त्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. बाळूने चार लाख परत दिले नाही म्हणून गणेशने विषारी औषध घेत आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक पाठक करीत आहेत.