अहमदनगर बातम्या

नैराश्यातून राहत्या घराच्या छताला गळफास घेत तरुणाची आत्महत्या

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2021 :- ढत्या नैराश्यामुळे आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. नुकतेच नगर जिल्ह्यातील कोपरगाव एक अशीच एक धाकादायक घटना घडल्याचे समोर येत आहे.

कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथील एका तरुण इंजिनीयरने नैराश्यातून राहत्या घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आकाश भाऊसाहेब पंडोरे वय २४ असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

आकाश हा इंजिनियर झाला होता. दरम्यान त्याने नैराश्येपोटी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या मागील नेमके कारण मात्र समजू शकले नाही.

कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव करीत आहे.

Ahmednagarlive24 Office