अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :- दौंड-मनमाड रेल्वेमार्गावर सूतगिरणी परिसरात युवकाचा मृतदेह आढळला. अभय यादव (वय १८, रामनगर, प्रभाग एक) असे त्याचे नाव आहे. शहर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
शवचिकित्सेनंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. दोन दिवसांपूर्वी घरात झालेल्या किरकोळ वादातून अभयने रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे समजते.
त्याच्यामागे आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.