अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :-श्रीरामपूर तालुक्यातील महांकाळवाडगाव येथे एका युवकाचा गोदावरी नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर तालुक्यातील महांकाळवाडगाव येथे रामभाऊ पोपट गायकवाड (वय ४० रा.सराला ता. श्रीरामपूर)
हा युवक सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान गोदावरी नदी पात्रात महांकाळवाडगाव शिवारात पाण्यातून मोटार काढण्यासाठी पाण्यात गेला होता. दरम्यान यावेळी हा तरुण नदीपात्रात पाय घसरून पाण्यात पडला व त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनास्थळी स्थनिक नागरिकांनी धाव घेतली व नागरिकांच्या मदतीने युवकाला पाण्याबाहेर काढण्यात आले. मयत व्यक्तीला शवविच्छेदनासाठी श्रीरामपूर येथील रूग्णालयात पाठविण्यात आले.
याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. याप्रकरणाचा पुढील तपास श्रीरामपुर तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस हेडकॉन्स्टेबल नवनाथ बर्डे हे करत आहे.