Ahmednagar News : अपघातातील जखमी तरूणाचा उपचारा दरम्यान मृत्यू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : श्रीरामपूर शहरातील बेलापूर रोडवरील सिध्दीविनायक मंदिरासमोर स्कॉर्पिओ व दुचाकीच्या नुकत्याच झालेल्या अपघातातील जखमी तरूणाचा उपचारा दरम्यान, नगर येथील एका खासगी रूग्णालयात मृत्यू झाला.

याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात स्कॉर्पिओ चालकाविरूद्ध नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश भोसले, असे मयत तरुणाचे नाव असून गुरुवारी (दि.14) सप्टेंबर रोजी बेलापूर येथील चर्चमधील प्रार्थनेनंतर

पुन्हा श्रीरामपूर येथील आपल्या घरी आकाश भोसले, महिमा भोसले, सुभद्रा भोसले हे तिघे दुचाकीवरून परतत असताना रात्री बेलापूर रोडवरील सिद्धीविनायक मंदिरासमोर स्कॉर्पिओने समोरून त्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली.

या अपघातात आकाशच्या डोक्याला मार लागल्याने त्याला सुरूवातीला येथील साखर कामगार हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी लोणी आणि त्यानंतर नगर येथे खासगी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

परंतु, उपचारादरम्यान आकाश भोसले त्याचा मृत्यू झाला. या अपघातात महिमा भोसले, सुभद्रा भोसले यांना देखील मार लागला असून महिमा हिच्यावर नगर येथे उपचार सुरू आहेत. याप्रकरणी येथील शहर पोलीस ठाण्यात स्कॉर्पिओ चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.