निवडणूक आली की गावागावतला सामाजिक एकोपा बिगडतो. एकमेकांच्य सणवार व सुख दुःखात आपण सहभागी होतो. मात्र निवडणूक आली की जातीचे विष पेरले जाते. त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडतो.या गोष्टीचा विचार करुन निवडणुक काळात जातीचे विष पेरणा-याला थारा देवु नका.
जाती-पातीतील सलोखा कायम ठेवा. ही निवडणुक आपल्याला विकासाच्या बाजुने घेवुन जायची आहे. जलसंधारण व मुख्यमंत्री सड़क योजना ह्या पंकजाताई मुंडे यांच्या आवडत्या योजनामुळे शेवगाव-पाथर्डीच्या विकासात भर पडलेली आहे. अनेक गावे पाणीदार झालेली आहेत. रस्ते,विज व पिण्याचे पाणी मिळालेले आहे.
दोन दिवस तुमचे गाव सांभाळा. बुथवर मतदान सत्तर टक्यापेक्षा अधिक कसे होईल याची काळजी प्रत्येक महायुतीच्या कार्यकर्त्याने घ्यावी. जातीवाद, दडपशाही व दबावाला बळी पडु नका. विकासासाठी व पंकजाताई मुंडे यांना बळ देण्यासाठी महायुतीची सत्ता आली पाहीजे. एक – एक आमदार महत्वाचा आहे.
माणिकदौंडी गणातुन मोठे मताधिक्य भारतीय जनता पक्षाला द्यावे असे आवाहन आमदार मोनिकाताई राजळे यांनी केले. माणिकदौंडी, जाटदेवळा व आव्हणवाडी येथे मतदारांशी सवांद साधला. यावेळी मोनिकाताई राजळे बोलत होत्या. रावसाहेब मोरे, सुनिल ओव्हळ, मुरमंहमद पठाण,आलमगीर पठाण,
अकुंश चितळे,शिवनाथ मोरे, काकासाहेब शिंदे, समीर पठाण,लक्ष्मणशेठ राठोड, आर.के.चव्हाण, सुंदरशेठ चव्हाण,रंगनाथ चव्हाण, मारुती चितळे, सोपान बोरसे, राजु मोरे, भास्कर गर्जे, अकुंश आठरे, दादा शेंबडे, दुर्गा वहालकर, महादेव रहाटे, रभाजी गर्जे, विजय चव्हाण, मिठु चितळे, अशोक गाडे, भाऊसाहेब जिवडे,
बबन गायकवाड, परमेश्वर गव्हाणे, राधाकिसन कर्डीले, अंगध गव्हाणे, लक्ष्मण आंधळे, जगन्नाथ आंधळे,किशोर राठोड, मिठु जोशी अशोक मोरे उपस्थित होते. यावेळी बोलताना मोनिकाताई राजळे म्हणाल्या, मी खुप संघर्ष केला.माझी शेवटची निवडणुक आहे. निवडणुकीत जातीचे भांडवल करणे दुर्दैवाचे आहे.
माणिकदौंडी परीसरातील विकासाला मी भरीव स्वरुपाचा निधी दिलेला आहे. तुम्ही माणिकदौंडी गणातुन गेल्या वेळेस मला अधिक मताधिक्य दिले होते.त्यावरच विजय मिळाला होता. आता विजय आणखी दिमाखदार झाला पाहीजे.
लोकसभेला केलेली चुक दुरुस्त करा.भाजपाला मत देवुन मला विजयी करा. शासनाच्या लोकाभिमुख योजना अश्याच सुरु ठेवण्यासाठी पुन्हा महायुतीचे सरकार आणण्यासाठी युवकांनी काम करावे. तुमचे बुथ सांभाळा व मतदान करुन विजयी करा असे आवाहन मोनिकाताई यांनी केले. सुनिल ओव्हळ यांनी स्वागत केल. राहुल जाधव यांनी सुत्रसंचालन केले.