जिल्हा परिषदेकडे ‘त्यातील’ 30 कोटी शिल्लक ; आता करणार ‘असे’ काही

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- जिल्हा परिषदेच्या सेस फंडात 30 कोटींचा निधी शिल्लक राहिला आहे. यात विविध हेडचा निधी, ग्रामपंचायतींचे अनुदान आणि ठेकेदारांची अनामत रक्कमेतील शिल्लक आदी रकमेचा समावेश आहे.

जिल्हा परिषदेच्या सेस फंडातील शिल्लक रक्कमेचा आढावा घेण्यासाठी काल जिल्हा परिषद पदाधिकार्‍यांच्या लालटाकी येथील शासकीय बंगल्यावर अधिकारी आणि पदाधिकारी यांची बैठक झाली. यावेळी हि माहिती समजली.

आता उरलेल्या या रकमेमधून जिल्हा परिषद पदाधिकार्‍यांनी 70 टक्क्यांपर्यंत विकास कामे करण्याचा मानस या बैठकीत व्यक्त केला.

जिल्हा परिषेच्या सेस फंडात ग्रामपंचायतींचे 50 टक्के अनुदानापोटीचे सुमार 7 ते 8 कोटी, कामे पूर्ण होवून ऑडिट झालेल्या कामांपैकी ठेकेदार यांचे 5 टक्के किंवा त्यापेक्षा अधिकची अनामत रक्कमेपोटी 8 कोटींच्याजवळपास रक्कम,

न वटलेल्या धनादेशाचे 3 ते 4 कोटी यासह अन्य रक्कम अशी सुमारे 30 कोटींचा निधी जिल्हा परिषद सेस फंडात शिल्लक आहे. या निधीचा जिल्हा परिषद पदाधिकार्‍यांनी आढावा घेतला.

यातील बहुतांशी निधी खर्च करण्याचा मानस पदाधिकारी यांनी व्यक्त केला आहे. यासाठी जिल्हा परिषद विभागनिहाय खातेप्रमुखांची पदाधिकार्‍यांनी बैठक घेतली.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले, उपाध्यक्ष प्रताप शेळके, अर्थ समितीचे सभापती सुनील गडाख, बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते, महिला बालकल्याण समितीच्या सभापती मीराताई शेटे, समाज कल्याण समितीचे सभापती उमेश परहर आदी उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24