Ahmednagar News : आपल्या परिसरातील व घरातील ओला आणि सुका कचरा योग्य प्रकारे वर्गीकृत करण्यासाठी जिल्ह्यात सोमवार दि. ८ जुलै२०२४ पासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.
दि.८ जुलै ते ७ ऑगष्ट २०२४ या कालावधीत विशेष मोहिम राबविण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्या नुसार जिल्ह्यातील सर्व गावात स्वच्छ ते चे दोन रंग- ओला हिरवा, सुका निळा. या नावाने हे अभियान राबविण्यात येणार आहे.
स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा – २ अंतर्गत राज्य माहे डिसेंबर २०२४ पर्यंत हागणदारीमुक्त अधिक मॉडेल करावयचे आहे. मॉडेल झालेल्या गावात दृष्यमान शाश्वत स्वच्छता ठेवणे आणि हागणदारी मुक्त अधिक झालेली गावे मॉडेल करणे यासाठी विविध विषयाच्या अनुषंगाने गृहभेटी च्या माध्यमातून जनजागृती साठी विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रत्येक गावात ५ संवादकाची निवड करण्यात येणार असुन हे संवादक प्रत्येकाच्या घरी जावून संदेश देण्यात येणार आहेत. यात सरपंच, उपसरपंच, ग्रामिण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती, ग्रामसेवक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, स्वच्छा ग्रही व बचत गटातील महिलांचा समावेश आहे.
ओला कचरा हिरव्या रंगाच्या डब्यात ठेवावा, तसेच सुका कचरा निळ्या रंगाच्या डब्यात ठेवण्या संदर्भात तसेच नियमित शौचालय वापर करणे, शास्त्र युक्त पद्धतीने घन कचरा व सांडपाणी व्यवस्थापन, गोबरधन, प्लास्टिक व्यवस्थापन, सुयोग्य मैला गाळ व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालय व नियमित वापर आदी बाबत गृहभेटीच्या माध्यमातून जन जागृती करण्यात येणार आहे.
गटविकास अधिकारी यांनी आपल्या तालुक्यातील गावांचे ५ संवादक कुंटुब समान वाटप करावे. व गृहभेटीचे ‘ आयोजन करावे, या कामी तालुक्यातील सर्व अधिकारी, विस्तार अधिकारी यांनी संनियंत्रण करून अंमल बजावणी करावी.
दर आठवड्याला या अभियानाचा जिल्हा स्तरावरून आढावा घेण्यात येईल तसेच सदर अभियानात गावा स्तरावरी सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी सक्रीय सहभाग नोंदवून अभियान यशस्वी करावे असे आवाहन, समर्थ शेवाळे प्रकल्प संचालक जल जीवन यांनी केले.