जनावरांवरील ‘त्या’संकटास जिल्हा परिषद रोखणार; ‘असे’ काही करणार, वाचा सविस्तर माहिती…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :-  जगभरात कोरोनाचे थैमान सुरु आहे. कोरोनाचा प्रार्दभाव रोखण्यासाठी बाधित रुग्णांचे विलीगीकरण करण्यात येते. माणसाप्रमाणे जनावरांचेही विलगीकरण करण्याची वेळ आली आहे. जनावरांना लंपी स्कीन डिसीज नावाच्या विषाणूने घेरले असून कोरोना रुग्णाप्रमाणे यांचेही विलगीकरण करावे लागत आहे.

हा विषाणू एका जनावरातून दुसर जनावरात सहज प्रवेश मिळवतो. या आजाराची साथ मराठवाड्यापाठोपाठ नगर जिल्ह्यातही पोहचली आहे. यामध्ये गाय, बैल, म्हैस, कालवड, वासरे, वळू यांच्यावर लंपी स्कीन डिसीज संसर्गजन्य विषाणूचा प्रादूर्भाव झाला आहे.

आता हा रोग औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातून जिल्ह्यात शिरकाव करू पाहत आहे. त्या आधीच त्याला जिल्ह्याच्या सीमेवर रोखण्याचा निर्णय जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने घेतला आहे.

यामुळे नेवासा तालुक्यातील बाधित असणार्‍या गोधेगाव आणि परिसरातील पाच किलो मीटर अंतरावरील गावांतील 3 हजार 400 जनावरांचे तातडीने लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे यांनी दिली.

दरम्यान, जिल्ह्याभरातून या संसर्गजन्य विषाणूला रोखण्यासाठी 50 हजार लसींची मागणी झाली आहे. जिल्हा परिषद सेवा शुल्कमधील निधीतून 46 हजार लस उपलब्ध होऊ शकते. शेतकर्‍यांनी आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांनी केले आहे.

जिल्हा परिषदे पशूसंवर्धन विभाग पहिल्या टप्प्यात त्यांच्याकडे असणार्‍या सेवा शुल्कच्या निधीतून 46 हजार लस विकत घेवून त्याद्वारे लसीकरण करू शकणार आहे. मात्र, त्यानंतर लसीची गरज भासल्यास त्यासाठी वेगळी तरतूद लागणार आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24