file photo

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2021 :- शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला पाठबळ देत उभे केले आहे.

स्व. अनिलभैय्यांच्या विचारावर काम करणारे व त्यांच्या संघर्षमय जीवनात त्यांना साथ देणारे अनेक जुने शिवसैनिक माझ्या संपर्कात आहे.

लवकरच जुन्या शिवसैनिकांची घर वापसी होणार आहे. सचिन जाधव हे स्व. अनिल भैय्यांचे निकटवर्तीय होते. त्यांचे अभीष्टचिंतन करताना आनंद होत आहे, असे प्रतिपादन युवासेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम राठोड यांनी केले.

माजी सभापती व बसापाचे नेते सचिन जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शहर शिवसेनेच्या वतीने चितळेरोड वरील शिवालय कार्यालयात जिल्हाप्रमुख विक्रम राठोड यांनी सत्कार करून अभीष्टचिंतन केले.

यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर, गिरीश जाधव, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, नगरसेवक योगीराज गाडे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.