Airtel Recharge Plan : ग्राहकांसाठी एअरटेल (Airtel) सतत नवनवीन प्लॅन आणत असते. एअरटेलने लाँच केलेल्या या प्लॅनमध्ये (Airtel Recharge) डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह तुम्हाला अनेक फायदे मिळतात.

त्याचबरोबर तुम्ही भरपूर डेटासह (Airtel Plan) OTT सबस्क्रिप्शनही (OTT subscription) मिळते. यामध्ये तुम्हाला 1 GB डेटा ते 3 GB हायस्पीड इंटरनेट मिळते.

एअरटेलच्या 699 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये (Airtel Prepaid plan) तुम्हाला 56 दिवसांच्या वैधतेसह दररोज 3GB डेटा मिळतो. म्हणजेच, तुम्हाला दोन महिन्यांसाठी दररोज 3 GB हायस्पीड इंटरनेट मिळेल. हाय स्पीड इंटरनेट मर्यादा संपल्यानंतर इंटरनेटला 64kbps स्पीड मिळेल.

699 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर केवळ 56 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग सुविधा उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 100 SMS देखील मिळतात.

एअरटेलच्या 699 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनच्या इतर फायद्यांबद्दल सांगायचे तर, त्यात Amazon Prime Mobile (Amazon Prime) सदस्यत्व उपलब्ध आहे. त्याची वैधता देखील 56 दिवसांसाठी उपलब्ध आहे.

यासोबतच तुम्हाला Airtel Xstream मोबाईलचे सबस्क्रिप्शन फक्त 56 दिवसांसाठी मिळते. Airtel Xstream सह SonyLiv देखील जोडता येईल. हे ओटीटी प्लॅटफॉर्म एअरटेल अॅपच्या मदतीने पाहिले जाऊ शकते.

699 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनच्या इतर फायद्यांबद्दल सांगायचे तर, या प्लॅनमध्ये तुम्हाला विंक म्युझिक अॅपवर मोफत गाणी ऐकण्याची सुविधा आणि मोफत हॅलो ट्यून्सचा लाभ मिळतो. याशिवाय या प्लॅनमध्ये Fastag वर 100 रुपयांचा कॅशबॅकही मिळतो.