Ajab Gajab News : निसर्गाच्या (nature) सानिध्यात अनेक वनस्पती, प्राणी आणि जीव आढळत असतात. झाडे आणि निसर्गाच्या सानिध्यातील काही वस्तू मानवासाठी खूप महत्वाच्या आहेत. मात्र काही अशाही वनस्पती (plant) आहे त्यांचे विष विषारी कोब्रा (venomous cobra) जातीच्या नागापेक्षाही विषारी आहे. त्याचा स्पर्श जरी झाला तरीही मनुष्याचा मृत्यू होऊ शकतो.

झाडे आणि वनस्पती हे केवळ आपल्या पर्यावरणासाठीच नाही तर मानवासाठीही खूप महत्त्वाचे आहेत. झाडे आणि वनस्पतींमधून आपल्याला ऑक्सिजन मिळतो. पृथ्वीवर झाडे-वनस्पती नसतील तर माणसाचे अस्तित्वच संपले असते.

परंतु काही झाडे अशी आहेत जी मानवासाठी घातक आहेत. आज त्याच बद्दल सांगणार आहोत. आज तुम्हाला अशाच एका झाडाविषयी सांगणार आहोत जे मानवी जीवनासाठी धोकादायक आहे.

सुसाइड ट्री (Suicide Tree) 

पृथ्वीवर सुसाइड ट्री म्हणजेच सरबेरा ओडोलम नावाची एक वनस्पती आहे, जी दिसायला जितकी सुंदर आहे तितकीच ती धोकादायकही आहे. हे झाड किंग कोब्रापेक्षाही धोकादायक असल्याचं म्हटलं जातं.

हे झाड इतके विषारी आहे की ते काही मिनिटांत माणसाला मृत्यू देऊ शकते. भारतासह दक्षिण-पूर्व आशियातील इतर काही देशांमध्ये आढळणारे सरबेरा ओडोलमचे (Sarbera Odolum) हे झाड विषारी आणि धोकादायक आहे. असे म्हटले जाते की या वनस्पतीमुळे प्रत्येक आठवड्यात किमान एक व्यक्तीचा मृत्यू होतो. या वनस्पतीवर अनेक संशोधने झाली आहेत.

Cerbera odollam नावाची ही वनस्पती विषारी आहे

या संदर्भात संशोधकांच्या मते, सरबेरा ओडोलम जगातील इतर विषारी वनस्पतींपेक्षा जास्त विषारी आहे. या वनस्पतीच्या बियांमध्ये सारबेरीन नावाचे तत्व असते जे विषारी असते.

याच्या थोड्या प्रमाणात शरीरात जळजळ, डोकेदुखी, उलट्या, अनियमित हृदयाचे ठोके आणि जुलाब होऊ शकतात. याच्या वापरामुळे काही तासांतच व्यक्तीचा मृत्यू होतो. त्याच्या खुणा शोधणे फार कठीण आहे असे म्हणतात.