नाशिक : मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल औरंगाबादमध्ये सभा घेत राष्ट्रवादी (Ncp) व राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादीच्या गोठातून प्रतिउत्तर येत आहेत. नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नाशिकमध्ये बोलताना राज ठाकरे यांची नक्कल केलेली आहे.

काल राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा शरद पवार (Sharad Pawar) जातीपातीचं राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर अजित पवार आज मीडियाशी बोलताना म्हणाले, नाशिककरांना माहिती आहे पवार जातीयवादी आहेत की नाही.

रामदास आठवले, राजू शेट्टी यांनीही सांगितलं की पवार जातीयवादी नाहीत. एखादा धादांत खोटं बोलत असेल तर त्याच्या बोलण्याला फार महत्व देण्याचं कारण नाही.

लोकसभेच्या (Lok Sabha) वेळेस आपली सुपारी घेतली होती, आता तिकडची घेतली, असेही अजित पवार म्हणाले आहेत. त्यानंतर मात्र अजित पवार यांनी सुपारी घेतली म्हणजे मविआ उमेदवारांच्या सपोर्टमध्ये ते बोलत होते, अशी सावरासारव केली आहे.

तसेच पुढे ते म्हणाले, राज ठाकरे यांनी आपल्या संपूर्ण भाषणात केवळ शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवरच टीका केली. यापूर्वी राज ठाकरे हे शरद पवारांचं कौतुक करताना थकत नव्हते. आता पवार साहेबांनी कुणाचं नाव घ्यायचं हा त्यांचा प्रश्न आहे.

आम्ही एखाद्याचं कौतुक केलं आणि नंतर टीका करायचं म्हटलं तर जीभ ही वळत नाही. ते दुपारी सभा का घेत नाहीत. संध्याकाळी वातावरण शांत असतानाच का घेतात. कधीतरी १५ दिवसातून एक सभा संध्याकाळी घ्यायची, असेही अजित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, अचानक बोलताना अजित पवार यांनी आपल्या सुरक्षारक्षकाकडे नॅपकिन मागितला आणि राज ठाकरे यांची नाक पुसण्याची नक्कल केली. अजितदादांनी राज यांची नक्कल करताच उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. त्याचवेळी नॅपकिन नाकाला लावत काय ते एकदाच शिकरुन घे, असा टोलाही अजितदादांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.