OTT Platform : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपट  3 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला.

तगडा स्टारकास्ट असूनही या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही.

विशेष बाब म्हणजे हा बिग बजेट सिनेमा असून या चित्रपटाचं बजेट 200 कोटी होतं.

मात्र या चित्रपटानं जवळपास बॉक्स ऑफिसवर अवघे 65 कोटींची कमाई केली.

आता बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेल्या हा चित्रपट ओटीटी रिलीज करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतलाय.

अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज होणार आहे.

‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटाआधी अक्षय कुमारचा बच्चन पांडे  हा चित्रपट देखील फ्लॉप ठरला होता.

अक्षयचे बॅक टू बॅक चित्रपट फ्लॉप ठरल्यानं आता अनेक लोक त्याला ट्रोल करत आहेत.