अहमदनगर Live24 टीम, 01ऑक्टोबर 2021 :-  दारूच्या नशेत एका मद्यपिणे पशूखाद्यामध्ये विषारी औषध टाकून आपल्याच दोन गायींना ठार मारल्याची घटना संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथे घडली आहे .

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील खांडगाव येथील ज्ञानेश्वर संपत गुंजाळ याने काल दारूच्या नशेत आपल्याच गाईच्या पशुखाद्यामध्ये विषारी औषध टाकल्याने दोन गायींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत त्याची पत्नी इंदुबाई गुंजाळ यांनी याबाबत दिलेल्या फिर्यादी वरून शहर पोलीस ठाण्यात पोलिसांनी ज्ञानेश्वर गुंजाळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.