Electric scooter : दिवसेंदिवस वाढत्या इंधनाच्या किमतीमुळे (Oil price) भारतात इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicle) संख्या वाढत आहे. अशातच अनेक कंपन्या इलेक्ट्रिक वाहनाचं उत्पादन करत आहेत.

यात काही नवीन कंपन्यांचाही (Electric company) समावेश असून या कंपन्यांनी दिग्ग्ज कंपन्यांना मागे टाकले आहे.

तथापि, इलेक्ट्रिक स्कूटरच्या बाबतीत, लोकांसमोर एक मोठी समस्या कंपन्यांच्या विश्वासार्हतेची आहे. किंबहुना, इलेक्ट्रिक टू-व्हीलरमध्ये काही जुन्या आणि विश्वासार्ह कंपन्या आहेत आणि नवीन कंपन्या आणि स्टार्टअप्स मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत.

लोकांनी ओलासारख्या (Ola) कंपन्यांवर विश्वास दाखवला, तरी तिथूनही त्यांची निराशा झाली.इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या घटना समोर आल्यावर ओलासह इतर अनेक कंपन्यांचा या यादीत समावेश झाला. पण लोकांनी ओलाच्या गुणवत्तेबद्दलही खूप तक्रारी केल्या.

मात्र, या सगळ्यामध्ये ज्या कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटर्स बनवण्यात सर्वात जास्त विश्वास दाखवला ती म्हणजे हिरो इलेक्ट्रिक (Hero Electric). या कंपनीने ऑगस्टमध्ये सर्वाधिक इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या. हिरो इलेक्ट्रिकने गेल्या महिन्यात म्हणजेच जुलैमध्ये सर्वाधिक स्कूटर विकल्या होत्या.

हिरो इलेक्ट्रिकने गेल्या महिन्यात 10,482 युनिट्सची विक्री केली असताना, ओलाची मागणी लक्षणीय घटली. ऑगस्टमध्ये ओलाने केवळ 3,435 इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या, तर ओकिनावाने 8558 युनिट्स, अँपिअरने 6402 युनिट्स, TVS मोटर्सने 6301 युनिट्स आणि एथर एनर्जीने 5284 युनिट्स विकल्या.

ओकिनावाने मारली बाजी

एप्रिल ते ऑगस्टपर्यंत देशात 2,25,986 इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री झाली. ज्यामध्ये ओकिनावा (Okinawa) 43,944 युनिट्ससह पहिल्या क्रमांकावर, तर हिरो इलेक्ट्रिक 35,364 युनिटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.