Indurikar Maharaj :समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी आपले ३० मेपर्यंतचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत. यासंबंधी त्यांनी पत्रक काढून कार्यक्रम रद्द केल्यामुळे राज्यभरातील नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.


इंदुरीकर यांची प्रकृती ठीक नाही. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना सक्तीने विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आङे. त्यामुळे त्यांनी २३ ते ३० मे या काळात आधीच बुक केलेले कीर्तनाचे सगळे कार्यक्रम रद्द केले आहेत. याबद्दल त्यांनी दिलगीरीही व्यक्त केली आहे. वैद्यकीय उपचारानंतर पुन्हा सेवेत रूजू होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.