Maharashtra News: राज्यात झालेल्या सत्ता बदलानंतर मराठा क्रांती मोर्चा मराठा समाजाच्या रखडलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी धडपडताना दिसत आहे.

मात्र हे प्रयत्न चालू असतानाच मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि छत्रपती संभाजीराजे यांच्यामध्ये बिनसल्याचे दिसून येत आहे.

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मुंबईत झालेल्या बैठकीत छत्रपती संभाजी राजे यांनी दमदाटी केल्याचे आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केले आहेत.

या घटनेमुळे मराठा समाजाच्या हितासाठी काम करणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाची भूमिका काय असेल याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मराठा समाजाच्या कोणत्या मागण्या सरकार दरबारी मांडण्यात याव्यात या संदर्भात चर्चा होत असताना संभाजी राजे यांच्याकडून कोणत्याही समन्वयकाला बोलू दिले जात नव्हते.

असा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केला आहे. या घटनेमुळे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक एकवटले असून त्यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. असे छत्रपती संभाजी राजे मराठा क्रांती मोर्चा संपवत आहेत असा आरोप देखील समन्वयकांनी त्यांच्यावर केला आहे.