Amazon Sale : ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ऍमेझॉन (E-commerce platform Amazon) पुन्हा एकदा ऍमेझॉन मान्सून कार्निव्हल सेलसह (Amazon Monsoon Carnival Sale) परत आले आहे. ग्राहक (Customer) उद्या म्हणजेच २२ जूनपर्यंत या सेलचा लाभ घेऊ शकतात.

अॅमेझॉन सेल अंतर्गत अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन मोठ्या डिस्काउंटसह (discounts) विकले जात आहेत. तुम्ही अॅपलचे ग्राहक असाल आणि तुम्ही स्वतःला iPhone 12 मिळवण्याचा विचार करत असाल, तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. विक्रीदरम्यान तुम्ही फक्त ₹२,५४२ मध्ये iPhone 12 चे मालक होऊ शकता.

चला तर मग जाणून घेऊया कसे?

iPhone 12 चा 64GB GB व्हेरिएंट Amazon सेल दरम्यान 18% डिस्काउंटसह Rs 53,999 मध्ये सूचीबद्ध आहे. याशिवाय, तुम्हाला iPhone 12 वर ₹ 9,200 चा एक्सचेंज बोनस देखील मिळत आहे.

तथापि, तुमचा फोन चांगल्या स्थितीत असेल आणि मॉडेल नवीनतम असेल तरच तुम्हाला पूर्ण लाभ मिळेल. यासह, तुम्ही दरमहा ₹ 2,542 च्या नो कॉस्ट EMI ऑफर अंतर्गत iPhone 12 देखील खरेदी करू शकता.

एवढेच नाही तर तुम्ही ICICI बँक क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 10% ची झटपट सूट मिळेल. म्हणजेच, अशा प्रकारे तुम्ही अतिशय स्वस्त दरात iPhone 12 स्वतःचा बनवू शकता.

आयफोन १२ फीचर्स

या फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सिस्टम आहे, ज्यामध्ये मुख्य कॅमेरामध्ये दोन कॅमेऱ्यांचा सेटअप आहे, त्यापैकी 12MP अल्ट्रा वाइड कॅमेरा, 12MP टेलिफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय 4x ऑप्टिकल झूम रेंज देण्यात आली आहे ज्यामुळे चित्र झूम करता येते.

या फोनमध्ये नाईट मोड, डीप फ्यूजन, स्मार्ट एचडीआर 3, ऍपल प्रोआरएडब्ल्यू सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. या फोनमध्ये नाईट मोड, 4K डॉल्बी व्हिजन HDR रेकॉर्डिंग वैशिष्ट्यासह 12MP TrueDepth सेल्फी कॅमेरा आहे.