अहमदनगर Live24 टीम, 03 नोव्हेंबर 2021 :- जिल्ह्यातील पशुधन धोक्यात येऊ लागले आहे. या धास्तीने बळीराजा तसेच पशुपालक देखील चिंताग्रस्त झाले आहे.

जिल्ह्यात लाळ खुरकूत व घटसर्प अशा प्रकारच्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊन सुमारे 25 ते 30 गायींचा मृत्यू झाल्याने शेतकरी धास्तावले आहेत.

जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील तिळापूर येथे दुग्ध व्यवसाय करणार्‍या शेतकर्‍यांच्या दिवाळी सणाच्या तोंडावर अतिशय वाईट परिस्थिती निर्माण होऊन लाळ खुरकूत व घटसर्प अशा प्रकारच्या संसर्गजन्य रोगाचा प्रादूर्भाव होऊन सुमारे 25 ते 30 गायी मृत्युमुखी पडल्या आहेत.

पशुवैद्यकीय विभागाने तातडीने लक्ष घालून संसर्गजन्य रोगाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. दरम्यान पशुपालकांचे नुकसान झालेल्यामध्ये संदीप काकड यांच्या 7 गायी,

जनार्धन काकड 4 व बाबासाहेब काकड यांच्या 4 गायी, विलास गीते यांच्या 3 गायी, तात्या तमनर 3 व 2 आजारी या ताप व जिभेवर काटे येणे

आजारात जनावरे दगावल्याने दिवाळीच्या सणासुदीच्या काळात कुटुंंबावर मोठे संकट ओढवले आहे. पशुवैद्यकीय विभागाने लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.