मुंबईतील दसरा मेळाव्यासाठी वांद्रे-कुर्ला संकुलातील ‘एमएमआरडीए’चे मैदान देण्यास परनावगी देण्यात आली, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला बीकेसीतल्या मैदानासाठी केलेला अर्ज फेटळाण्यात आला, तर शिवाजीपार्कचा निर्णय प्रलंबित आहेत.

आता नवरात्रासंबंधीचा आणखी एक फैसला शिंदे गटाच्या बाजूने झाला आहे. कल्याणमध्ये दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्र उत्सवात साजरा करण्यासाठी शिंदे गटाला परवानगी देण्यात आली असून ठाकरे गटाचा अर्ज फेटाळण्यात आला आहे.

दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाचे कल्याण शहर प्रमुख सचिन बासरे यांच्यासह शिंदे गटाचे शहर प्रमुख विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगीसाठी अर्ज केला होता.

याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. त्यांनी शिंदे गटातील विश्वनाथ भोईर यांना किल्ले दुर्गाडीवर नवरात्र उत्सव साजरा करण्याची परवानगी दिली आहे.

शिवसेनेर्फे कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर ५४ वर्षांपासून नवरात्र उत्सव साजरा होत होत आहे. फुटीनंतर तेथेही वाद निर्माण झाला होता. अखेर फैसला शिंदे गटाच्या बाजूने लागला.