apples-on-white-background

Apple rates : काश्मिरचे फळ म्हणून मान्यता असलेले आणि डॉक्टरांनी आरोग्यासाठी सुचविलेले सफरचंद आता स्वस्तात मिळू लागले आहे. इतरवेळी दीडशे रुपये किलोने मिळणारे लालबुंद सफरचंद आता केवळ ८० ते १०० रुपये किलो या दराने विकले जात आहे.

या हिवाळ्यात आरोग्याच्या दृष्टीने सफरचंदाचे सेवन चांगले असल्याने सफरचंदाच्या विक्रीतही वाढ झाली आहे. रस्तोरस्ती हातगाड्यांवर सफरचंद विक्रीस आले आहेत. विशेष म्हणजे सफरचंदांचे दर कमी झाल्याने सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहे.

गेल्या महिन्यापासून नाशिकमध्ये सफरचंदाची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे. उन्हाळ्यात दीडशे ते दोनशे रुपये प्रतिकिलो असलेले सफरचंदाचे दर आता निम्म्याने कमी झाले आहेत.

दररोज हे फळ खाल्ले तरी हरकत नाही, असे डॉक्टरांचे सांगणे आहे. दररोज एक सफरचंद खा आणि बाजारपेठेत सर्वत्र दिसू लागले प्रतिकिलो या दराने विकले जात नाशिककरांनी येत्या दोन महिन्यांत सफरचंदाचे दर स्वस्त झाल्याने डॉक्टरांना दूर ठेवा, अशी म्हण मिळत असतात.

आगामी तीन महिने आवक वाढ

डिसेंबर ते मार्च महिन्यात विदेशातूनही सफरचंदाची आवक होणार असल्याने कदाचित यापेक्षाही अधिक कमी किंमतीत सफरचंद मिळण्याची शक्यता आहे. सफरचंदाला वर्षभर जरी मागणी असली तरी उत्पादन जास्त झाल्यास दरावर परिणाम होत असतो.

भारतासह इराण, पोलंड, तुर्कस्थान येथूनही सफरचंदाची आवक होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सफरचंदांची आवक सुरु राहणार आहे. नाशिकमध्ये काश्मिर व हिमाचल प्रदेशातून सफरचंद येत आहेत.

नाशिकमध्ये दररोज ३० ते ४० मालट्रक सफरचंद येत असतात. ग्राहकही मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने आगामी काळात अशीच आवक राहण्याची शक्यता सफरचंद विक्रेते यांनी व्यक्त केली आहे