file photo

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- गेल्या अडीच महिन्यांपासून रिक्त असलेल्या अहमदनगर शहर पोलीस उपअधीक्षक पदी नाशिक ग्रामीण येथे कार्यरत असलेले अनिल कातकडे

तर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपअधीक्षक पदी नाशिक शहर येथे कार्यरत असलेले कमलाकर जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या गृह विभागाने गुरूवारी रात्री उशिरा १७५ पोलीस निरीक्षकांच्या पोलीस उपअधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त यांच्या पदोन्नती नंतरच्या पदस्थापनाबाबत आदेश काढले. अहमदनगर शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांची बदली झाल्याने गेल्या अडीच महिन्यांपासून शहर पोलीस उपअधीक्षक पद रिक्त होते.

नगर ग्रामीणचे उपअधीक्षक अजित पाटील आणि त्यानंतर श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे शहर पोलीस उपअधीक्षक पदाचा प्रभारी पदभार होता. कातकडे यांच्या नियुक्तीने अहमदनगर शहराला पुर्णवेळ पोलीस उपअधीक्षक मिळाले आहे.

तसेच आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपअधीक्षक प्रांजल सोनवणे यांच्या बदलीनंतर हे पद रिक्त होते. त्यांच्या जागी जाधव यांना नियुक्ती मिळाली आहे.

दरम्यान जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक अंबादास भुसारी यांना पदोन्नती नंतर सहायक पोलीस आयुक्त, नाशिक शहर येथे तर पोलीस निरीक्षक नारायण न्याहळदे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक येथे नियुक्ती मिळाली आहे.