Psoriasis on elbow. Close-up

अहमदनगर Live24 टीम, 03 ऑक्टोबर 2021 :- हिवाळ्यात सामान्य त्वचेची देखभाल करणे ही अवघड जाते.अशा वेळेस जर तुम्ही त्वचारोग सोसायसिसने ग्रस्त असाल तर समस्या अधिक वाढते. अन्य दिवसांच्या तुलनेत थंडीत ही समस्या वाढते. बदलत्या हवामानात थोडीशी सावधगिरी बाळगल्यास निश्‍चितच सोरायसिसमध्ये आराम मिळतो . . .

० सोरायसिस काय आहे ? : – सोरायसिस हा एक प्रकारचा त्वचारोग आहे, ज्यामध्ये पूर्ण शरीरावर किंवा शरीराच्या एखाद्या विशिष्ट भागावर लाल रंगाचे खरखरीत धब्बे तयार होतात. याला खाजही खुप येते. त्याच्या जखमा होतात. या स्थितीस सोरायसिस असं म्हणतात. या मध्ये खाजे बरोबर वेदनाही होतात.

० सोरायसिस का होतो ? :-

» सोरायसिस अनुवंशिक आजार आहे. जर कुटुंबातील एखादी व्यक्ती या आजाराने ग्रस्त असेल तर कुटुंबातील इतर व्यक्तींनाही हा आजार होण्याचा धोका निर्माण होतो.

» रोगप्रतिकारक क्षमता कमजोर असणं हे सुद्धा सोरायसिसला कारणीभूत ठरते.

» शरीराची रोगप्रतिकारक क्षमता गरजेपेक्षा अधिक प्रमाणात प्रतिक्रिया देत असेल, तर यालाही सोरायसिसचे प्रमुख कारण मानले जाते.

» तणावामुळे ही सोरायसिस होतो.

» धूम्रपान आणि अल्कोहोलचे सेवन हे सुद्धा याचं मुख्य कारण आहे.

» कधी कधी असंतुलित आहार ही याला कारणीभूत ठरतो. मुलांमध्ये होणारा घशाचा संसर्ग स्ट्रेटोकोकलचा योग्य वेळेस उपचार न होण्यानेही ही समस्या होण्याची शक्‍यता वाढते.

० कोणाला होऊ शकतो ? : –

सोरायसिस लहान मुलं- मोठे कोणालाही होऊ शकतो, हा स्पर्शाने होणारा आजार नाही. सामान्यतः वीस ते तीस वयाच्या व्यक्ती या आजाराने अधिक त्रस्त आहेत. एकदा सोरायसिस झाल्यानंतर तो पुन्हा पुन्हा होण्याची शक्‍यता वाढते. थंडीत हा आजार होण्याची शक्‍यता अधिक असते.

एवढंच नाही, तर हा आजार बरा झाल्यानंतर पुन्हा होण्याची शक्‍यताही असतेच. ज्या कुटुंबातील व्यक्तीला ही समस्या असते त्या कुटुंबातील व्यक्तीला हा आजार सहज होऊ शकतो. सोरायसिस हा अनुवंशिक आजार आहे, असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही.

० कसं ओळखाल ? : – या आजारामध्ये संपूर्ण शरीर किंवा शरीराच्या एखाद्या भागावर लाल किंवा पांढऱ्या रंगाचे चट्टे पडतात. यांना खूप खाजही येते. सतत खाजवल्यामुळे जखमाही होतात. शरीरावर त्वचेचा जाड थर जमा होतो. त्वचेचे थर निघू लागतात. सोरायसिसने ग्रस्त व्यक्तीची त्वचा कांतिहीन, रूक्ष, जाड दिसू लागते.

त्वचेचा जाड थर निघण्याने त्वचेतून रक्त येते. डोक्यावर हे कोंड्या प्रमाणे दिसते. सोरायसिस कोपर, गुडघे, पाठ, डोकं, हाताचे आणि पायाचे तळवे यामध्ये अधिक होतो. पण कधी कधी संपूर्ण शरीरावरही होतो. या स्थितीस क्रॉनिक सोरायसिस असं म्हणतात. जर सोरायसिस खूप दिवसांपासून असेल तर शरीराच्या सांध्यांमध्ये सूज येते.

० हळद रामबाण : – सोरायसिसने ग्रस्त व्यक्तीसाठी हळद अतिशय उपयुक्त ठरते. हळदीमध्ये अँटी बॅक्टेरिअल गुण आढळतात. त्याच्या वापराने रूणाला आराम मिळतो. अर्धा किलो हळद चार लिटर पाण्यात उकळवा, जोपर्यंत दोन लिटर पाणी उरत नाही. त्यामध्ये शंभर ग्रॅम मध मिसळा.

सोरायसिसने ग्रस्त व्यक्तीने दोन-तीन वेळा हेच पाणी प्यावे. हळदीत पाणी मिसळून त्याची घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट सोरायसिस ग्रस्त त्वचेवर रात्रभर लावा. अंघोळीच्या पाण्यात एक चिमूट हळद मिसळून अंघोळ करा. हळदीच्या नियमित सेवनाने सोरायसिस पासून मुक्ती मिळेल.

० कोरफड जेलची कमाल : – कोरफड त्वचेशी संबंधित कोणत्याही समस्येपासून मुक्ती मिळविण्यासाठी सहायक ठरते. कोरफडीचा एक तुकडा घ्या. ती मधून कापा. साल काढा. हा गर त्वचेला दिवसातून दोन-तीन वेळा लावा. यामुळे आराम मिळेल. याच्या नियमित वापराने आजारापासून मुक्ती मिळेल. याचा त्वचेवर काही परिणाम होत नाही.