Cars Price Hike : सणासुदीच्या काळात अनेक कंपन्यांनी आपल्या कार्सवर जबरदस्त ऑफर दिली होती. त्यामुळे या काळात कंपन्यांच्या गाड्यांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली होती.

परंतु, सणासुदीनंतर ग्राहकांना चांगलाच धक्का बसला आहे. कारण काही लोकप्रिय कंपन्यांनी आपल्या कार्सच्या किमतीत वाढ केली आहे. या कंपन्या नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

टाटांनीही दणका दिला

भारतातील सर्वात मोठ्या कार कंपन्यांपैकी एक असलेल्या टाटाने शनिवारी माहिती दिली की कंपनी 7 नोव्हेंबरपासून आपल्या कारच्या किमती वाढवणार आहे. किंमतींमध्ये सरासरी 0.9 टक्के वाढ होईल.

कोणत्या कारच्या किमती वाढल्या आहेत?

टाटाने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी सर्व कारच्या किमती वाढवणार आहे. यामध्ये Tiago, Punch, Altroz, Tigor, Nexon, Harrier आणि Safari या गाड्यांचा समावेश आहे.

टाटा सोडून आणखी कोणी किंमत वाढवली

टाटा व्यतिरिक्त, स्कोडा ने देखील अलीकडे मध्यम आकाराच्या एसयूव्ही कुशकच्या किमतीत वाढ केली आहे. स्कोडा कंपनीने कुशकच्या किमती 60,000 रुपयांनी वाढवल्या आहेत. दरवाढीनंतर कुशकच्या बेस व्हेरिएंट Active 1.0 MT ची एक्स-शोरूम किंमत 11.59 लाख रुपये झाली आहे. किंमतवाढीपूर्वी, सहा एअरबॅगसह या प्रकाराची एक्स-शोरूम किंमत 11.29 लाख रुपये होती.

Kia ने Carens ची किंमत देखील वाढवली आहे

दक्षिण कोरियाची कार कंपनी किआनेही नोव्हेंबरमध्ये सात-सीटर एमपीव्हीच्या किमती वाढवल्या होत्या. कंपनीने त्याच्या किमती 50,000 रुपयांपर्यंत वाढवल्या आहेत. कॅरेन्सच्या सर्व प्रकारांच्या किमती कंपनीने वाढवल्या आहेत.1.5 लिटर NA पेट्रोल प्रेस्टिज व्हेरियंटच्या किमतीत 50,000 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

1.5 लिटर NA पेट्रोल प्रीमियम व्हेरियंटच्या किमती 40,000 रुपयांनी वाढल्या आहेत. 1.4 लीटर टर्बो-पेट्रोल लक्झरी व्हेरियंट 15,000 रुपयांनी महाग झाला आहे. 1.5 लिटर डिझेल लक्झरीच्या किमतीत 35,000 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

याशिवाय कॅरेन्स डिझेलच्या सर्व प्रकारांमध्ये 30,000 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. Prestige Plus DCT, Luxury Plus 6S, Luxury Plus 7S, Luxury Plus 6S DCT, Luxury Plus 7S DCT आणि 1.4L टर्बो पेट्रोलच्या किमती प्रत्येकी 20,000 रुपयांनी वाढल्या आहेत.

प्रीमियम, प्रेस्टीज आणि प्रेस्टीज प्लस प्रकारांमध्ये सर्वात कमी किंमत केली गेली आहे. या सर्व व्हेरियंटच्या किमतीत 10 हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.