दारू दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून लाखो रुपयांची रोकड लांबवली

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- नगर शहरासह जिल्ह्यात चोरटयांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. यातच नगरमध्ये एक धाडसी चोरीची घटना घडली आहे. नगर येथील एका वाईन शॉप व्यवस्थापकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून दुकानातील दहा लाखाहून अधिक रुपयांची चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, रविवार (दि.१२) राञी काळया रंगाच्या नंबर … Read more

सोने आणखीनच घसरले, एक महिन्याच्या निचांकी स्तरावर;जाणून घ्या सोन्याचे आजचे लेटेस्ट दर

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :-  आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे सोमवारी भारतात सोने आणि चांदीच्या भावात घसरण होताना दिसली. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) सोन्याच्या भावात सोमवारी किंचित वाढ नोंदवण्यात आली असली तरी सोन्याने सध्या गेल्या महिनाभरातील निचांकी स्तर गाठला आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याचा दर 0.14 टक्क्यांनी वाढून प्रतितोळा 46,872 रुपयांच्या पातळीवर स्थिरावला. तर चांदीच्या … Read more

कमालच झाली ! पेट्रोल -डिझेलच्या किंमती सलग आठव्या दिवशी स्थिर; जाणून घ्या लेटेस्ट दर

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :-  देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा एकदा फ्रीझ मोडमध्ये जाताना दिसत आहेत. कारण, भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी सलग आठव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. पेट्रोलियम कंपन्यांनी सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 107.26 रुपये तर एका लीटल डिझेलसाठी 96.19 रुपये मोजावे लागत आहेत. … Read more

फेसबुक व व्हाट्सअप वापरताय मग ही काळजी घ्या..

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- सध्या फेसबूक व व्हाट्सअपच्या माध्यमातून फसवणूक केली जात असून ब्लॅकमेल करून आर्थिक मागणी केली जाती. नेमकी कशी फसवणूक केली जाते व त्यावर काय काळजी घ्यावी याबाबत अहमदनगर येथील सायबर क्राइमचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी माहिती दिली आहे. याबाबत पोलीस निरीक्षक दुधाळ म्हणाले की, बराच वेळा एखादी सुंदर … Read more

अवैध दारू विक्री करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- नेवासा तालुक्यातील सोनई- बेल्हेकरवाडी रोडवर विनापरवाना देशी दारूच्या ९६ सीलबंद बाटल्या व एक मोटार सायकल ताब्यात घेऊन दोन जणांवर सोनई पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस ठाण्याकडून समजलेली माहिती अशी की, सोनई बेल्हेकरवाडी रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ श्रीकांत सुदर्शन पालेपवार (वय ३२ रा.सोनई ता. नेवासा) रणजीत बाबुराव झाडगे … Read more

नगरकरांसाठी खुशखबर ! मनपाच्या मालिकेचा असलेला ‘हा’ तलाव भरला

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :-  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळेच नगर महापालिकेच्या मालकीचा असणार्‍या पिंपळगाव माळवीचा तलाव भरला असून सांडीवरून पाणी वाहत असल्याने या ठिकाणी पर्यटकांनासाठी नगरकरांची मोठी गर्दी होतांना दिसत आहे. दरम्यान पर्यटकांची वाढती गर्दी पाहता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. नगरपासून काहीश्या अंतरावर पिंपळगाव … Read more

मुख्य बाजार नेप्तीला हलवण्याचा आमदारांचा सोयऱ्यांच्या मदतीने डाव !

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील मुख्य बाजार हा नेप्तीच्या उपबाजारात हलविण्याचा शहराच्या आमदारांचा सोयऱ्यांच्या मदतीने डाव शिजत आहे. यामुळे व्यापारी, हमाल, मापाडी, किरकोळ विक्रेते, व्यावसायिक हे रस्त्यावर येतील. काँग्रेस हे कदापि होऊ देणार नाही. त्यांचा डाव उधळून लावण्यासाठी बाजार समितीवर बुलडोजर फिरवण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांच्या नीच कृत्याला आडवा पाय … Read more

एकच रात्री चोरटयांनी विविध ठिकाणी चोरीचा केला प्रयत्न; या तालुक्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली आहे. रात्रीच्या अंधारात होणाऱ्या चोऱ्या आता दिवसाढवळ्या होऊ लागल्या आहेत. यातच जामखेड तालुक्यातील जातेगाव येथे चोरटयांनी धुमाकूळ घातलाय. काही ठिकाणी घरफोडी झाली तर काही ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न झाला. यामुळे गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, जामखेड तालुक्यातील जातेगाव मध्ये चोरटयांनी एकाच … Read more

पद्मश्री विखे साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक टी. आर.ढोने यांचे निधन

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :-  प्रवरानगर येथील पद्मश्री विखे कारखान्याचे विद्यमान कार्यकारी संचालक टी. आर.ढोने यांचे निधन झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ८ वाजता घडली. श्री.ढोने हे पद्मश्री विखे कारखान्याचे कार्यकारी संचालक म्हणून काम बघत होते. त्यांनी काही काळ राहुरी येथील डॉ.तनपुरे कारखान्यात कार्यकारी संचालक म्हणून काम बघितले होते. अत्यंत मनमिळावू ,सर्वांशी प्रेमाने व … Read more

‘या’ तालुक्यात केवळ सात दिवसांमध्ये 22 हजार नागरिकांचे लसीकरण

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लसीकरण हाच केवळ एकमेव उपाय सध्या दिसून येत आहे. यामुळे शासनाने देखील लसीकरणावर भर दिली आहे. यातच जिल्ह्यात लसीकरणाला नागरिकांचा देखील उत्तम प्रतिसाद मिळला आहे. यातच जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात आजपर्यंत 83 हजार 644 नागरिकांनी लसीचा पहीला डोस घेतला असून दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या 35 हजार … Read more

कोरोनामुळे लग्नावर आधारित व्यवसाय संकटात; बँडवाल्यांवर उपासमारीची वेळ ओढवली

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- कोरोनामुळे गेल्या अनेक सहा महिन्यांपासून राज्यासह देशांमध्ये लॉकडाऊन असताना संपूर्ण लग्नसराईवर विरजण पडले होते. त्यामुळे बँडवाले,घोडेवाले,लाइटिंगवाले यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. शासनाकडे निवेदने सादर करूनही कोणतीही दाखल घेतली जात नसल्याने आर्थिक मदतीपासून वंचित राहिलेल्या या कलाकारांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. गेल्या दोन वर्षापासून करोनाचे संकट निर्माण झाल्याने व … Read more

रेशनच्या धान्याचा काळाबाजार; शेवगाव पुरवठा विभागाचा कारभार आला चव्हाट्यावर

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथे स्वस्त धान्य दुकानातील माल रिकाम्या बारदाण्याच्या वाहनातून काळ्याबाजारात विक्री करण्यासाठी घेऊन जात असताना ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडले. या घटनेची माहिती शेवगावच्या तहसीलदार यांना दिल्यानंतर प्रशासकी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन दुकानातील धान्य साठ्याचा पंचनामा केला. यामुळे शेवगावच्या पुरवठा विभागातील गैरकारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. याबाबत … Read more

मालधक्का दुसरीकडे हलविण्याचा डाव साध्य होऊन देणार नाही – आमदार जगताप

हमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- नगर शहरातील रेल्वे मालधक्का दुसरीकडे हलविण्याचा चालू आलेला डाव साध्य होऊन देणार नाही. जर हा मालधक्का स्थलांतरित झाला तर 600 माथाडी नोंदणीकृत कामगारांवर उपासमारीची वेळ येईल, यास जबाबदार कोण? नगर रेल्वे स्टेशन वरील मालधक्का सर्वांसाठी सोयीचा आहे. असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे. रेल्वे स्टेशनवरील हमाल … Read more

मध्यमेश्वर बंधारा ठरतोय मच्छीमार व्यावसायिकांचा आर्थिक सहारा

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- नेवासा शहर व नेवासा बुद्रुक या गावांच्या मध्यावर असलेली प्रवरा नदी दुतर्फा भरून वाहू लागल्याने या ठिकाणी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अनेक अनेक तरुण मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करत आहेत. याचाच एक भाग म्हणून नेवासा शहरालगत आसलेला मध्यमेश्वर बंधारा सध्याच्या स्थितीला अनेकांच्या उपजिविकेचे साधन बनला आहे. करोना सारख्या … Read more

दिलासादायक ! जिल्ह्यातील ‘हे’ मोठे धरण झाले ओव्हरफ्लो

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा आणि मुळा धरण परिसरात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार पाऊस कोसळत असल्याने या सर्व धरणांमध्ये या हंगामातील नवीन पाण्याची विक्रमी आवक झाली आहे. यामुळे भंडारदरा धरण ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, भंडारदरा आणि वाकी तलावाचा … Read more

मुसळधार पावसामुळे मुळा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ; धरण ‘इतके’ टक्के भरले

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- हरिश्चंद्र गड, आंबित, पाचनई, कोतूळ भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मुळा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. व यामुळेच मुळा धरणात पाण्याची जोरदार आवक होत आहे. पाण्याची आवक सुरू असल्याने आज सकाळपर्यंत धरणातील पाणीसाठा 22800 दलघफूच्या पुढे सरकण्याची शक्यता आहे.यामुळे मुळा धरण 88 टक्के भरले आहे. गेल्या काही … Read more

राहुरीत ना. प्राजक्त तनपुरे यांची कार्यकर्त्यांनी केली पेढेतूला

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- राहुरी शहरातील तनपुरे वाडी रोड परिसरातील गिरगुणे मळा येथील शिव चिदंबर मंदिर येथे राज्याचे ऊर्जाराज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवार 12 सप्टेंबर रोजी पेढेतूला करण्यात आली. शिवचिदंबर मंदिरात वजन काट्याच्या एका बाजूला ना.प्राजक्त तनपुरे तर दुसऱ्या बाजूत ना. तनपुरे यांच्या वजनाइतके पेढे ठेऊन पेढेतूला करण्यात आली. … Read more

नगर- मनमाड रस्त्याबाबत दोन दिवसात बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावू खा सदाशिव लोखंडे

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- नगर- मनमाड रस्त्याचे कामाबाबत संबंधित अधिकारी व ठेकेदार यांचे समवेत येत्या दोन दिवसात बैठक घेवून काम मार्गी लावणार असल्याचे खा. सदाशिव लोखंडे यांनी देवळाली प्रवरा मेडिकल हेल्प टीमसोबत चर्चा करताना सांगितले. नगर- मनमाड रस्त्याची दुर्दशा व त्याबाबत जनतेत असलेला तीव्र असंतोष लक्षात घेता त्याचे काम तातडीने हाती घेण्यात … Read more