अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लसीकरण हाच केवळ एकमेव उपाय सध्या दिसून येत आहे. यामुळे शासनाने देखील लसीकरणावर भर दिली आहे. यातच जिल्ह्यात लसीकरणाला नागरिकांचा देखील उत्तम प्रतिसाद मिळला आहे.

यातच जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात आजपर्यंत 83 हजार 644 नागरिकांनी लसीचा पहीला डोस घेतला असून दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या 35 हजार 328 आहे.

सध्या लसीची उपलब्धता चांगल्याप्रकारे होत असून ज्यांनी अजून लस घेतली नाही त्यांनी लस टोचून घ्यावी असे आवाहन आरग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

तालुक्यातील 3 लाख 7 हजार लोकसंख्येमध्ये 18 अधिक वयाचे लसीकरण लाभर्थ्यांची संख्या 1 लाख 84 हजार 200आहेत पैकी पहीला डोस घेतलेल्यांची 83 हजार 644 संख्या आहे.

अजूनही जवळपास एक लाख लसीकरण होणे बाकी आहे. आता लस पुरवठा वाढलेला आहे. तरी नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन डॉ. घोलप यांनी केले आहे.

दरम्यान कोपरगाव तालुक्यात आता 146 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहेत. तर 52 गावांत एकही रुग्ण नाही. चालू आठवड्यामध्ये तालुक्यात उच्यांकी कोविड लस प्राप्त झाली होती. यामुळे तालुक्यात चालू आठवड्यात 22 हजार लसीकरण झाले आहे.