अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :-  प्रवरानगर येथील पद्मश्री विखे कारखान्याचे विद्यमान कार्यकारी संचालक टी. आर.ढोने यांचे निधन झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ८ वाजता घडली.

श्री.ढोने हे पद्मश्री विखे कारखान्याचे कार्यकारी संचालक म्हणून काम बघत होते. त्यांनी काही काळ राहुरी येथील डॉ.तनपुरे कारखान्यात कार्यकारी संचालक म्हणून काम बघितले होते.

अत्यंत मनमिळावू ,सर्वांशी प्रेमाने व मनमिळाऊपणे वागणारे हुशार व्यक्ती एम.डी ढोने यांचे शुक्रवारी रात्री निधनाचे वृत्त समजताच सर्वांनी हळहळ व्यक्त केली.

आज सकाळी संगमनेर तालुक्यातील पिंपळे या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाबद्दल माजीमंत्री आ.राधाकृष्ण विखे, खा. डॉ.सुजय विखे, माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के,

जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे तसेच प्रवरा कारखान्याचे संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांनी शोक व्यक्त केला.