file photo

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :-  आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे सोमवारी भारतात सोने आणि चांदीच्या भावात घसरण होताना दिसली. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) सोन्याच्या भावात सोमवारी किंचित वाढ नोंदवण्यात आली असली तरी सोन्याने सध्या गेल्या महिनाभरातील निचांकी स्तर गाठला आहे.

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याचा दर 0.14 टक्क्यांनी वाढून प्रतितोळा 46,872 रुपयांच्या पातळीवर स्थिरावला. तर चांदीच्या दरात 0.4 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली असून प्रतिकिलो चांदीचा दर 63,345 रुपये इतका आहे. गेल्या सत्रात सोन्याच्या किंमतीमध्ये 0.4 टक्के आणि चांदीच्या किंमतीत 0.9 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही सध्या सोने आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात 2.1 टक्क्यांची घसरण होऊन सोन्याचा भाव प्रतिऔंस 1,787.40 डॉलर्सवर स्थिरावला होता.अशा परिस्थितीत आम्ही देशातील बहुतेक मोठ्या शहरांचे दर येथे देत आहोत.

या बातमीमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम दिली आहे. हे लक्षात घेतले पाहिजे की एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजार दर हे विदाउट टॅक्स आहेत, त्यामुळे देशांतर्गत बाजारात दरांमध्ये फरक आहे.

भारतामधील 22 कॅरेट सोन्याचे भाव –

ग्रॅम  22 कॅरेट (भाव रुपयांत)

1 ग्रॅम  4,614

8 ग्रॅम  36,912

10 ग्रॅम  46,140

100 ग्रॅम  4,61,400

भारतामधील 24 कॅरेट सोन्याचे भाव –

ग्रॅम  24 कॅरेट (भाव रुपयांत)

1 ग्रॅम  5,034

8 ग्रॅम  40,272

10 ग्रॅम  50,340

100 ग्रॅम  5,03,400

प्रमुख शहरातील सोन्याचे भाव –

शहर  22 कॅरेट  24 कॅरेट

मुंबई  46,070  47,070

पुणे  45,170  48,620

नाशिक  45,170  48,620

अहमदनगर  45,180  47,440