दिलासादायक ! जिल्ह्यातील ‘हे’ मोठे धरण झाले ओव्हरफ्लो

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा आणि मुळा धरण परिसरात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

जोरदार पाऊस कोसळत असल्याने या सर्व धरणांमध्ये या हंगामातील नवीन पाण्याची विक्रमी आवक झाली आहे. यामुळे भंडारदरा धरण ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, भंडारदरा आणि वाकी तलावाचा विसर्ग तसेच अन्य ओढ्यानाल्यांचे पाणी निळवंडे धरणात जमा होत असल्याने सध्या 86 टक्के साठा असून दोन दिवसांत हेही धरण भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, भंडारदराचा ओव्हरफ्लो 4400 क्युसेक, वाकीचा 789 क्युसेक तसेच अन्य ओढे-नाल्यांचे पाणी असे मोठ्या प्रमाणात पाणी निळवंडेत जमा होत आहे. रविवारी सायंकाळी 7130 दलघफू पाणीसाठा झाला होता.

तासागणिक धरणातील साठा वाढू लागला आहे. पावसाचा जोर असाच टिकल्यास निळवंडेही ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. दरम्यान प्रवरा नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे असे आवाहन जलसंपदा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाल्या मुळे यानंतर अधिक विसर्ग वाढविला जाणार नसल्याची माहिती शाखा अभियंता देशमुख यांनी दिली. दरम्यान राज्यात सर्वदूरच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

यामुळे अनेक ठिकाणी धरणे भरली आहे. तर अनेक ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी देखील ओलांडली आहे. यातच नगर जिल्ह्यातही पावसाचे आगमन झाल्याने बळीराजा सुखावला आहे.