अपघात टाळण्यासाठी दिंड्यांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी
शिर्डी येथून आळंदी येथे चाललेल्या महामंडलेश्वर काशिकानंद महाराज यांच्या दिंडीत संगमनेर तालुक्यात कंटेनर घुसून झालेल्या अपघातात ताराबाई गमे, भाऊसाहेब जपे, बबन थोरे, बाळासाहेब गवळी या चार वारकऱ्यांचे निधन झाले होते. अशा घटना टाळण्यासाठी दिंड्यांना पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी वारकऱ्यांसाठी आयोजित आदरांजली सभेत राहतेकरांनी केली. राहाता शहरातील मारुती मंदिरात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. महामार्गावरून … Read more