अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :- भारतात Electric Vehicles ची मागणी वाढत आहे आणि लोक इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रस दाखवत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे Electric Car, Electric Bike आणि Electric Scooter मध्येही सर्वसामान्यांची उत्सुकता वाढली आहे.(Hero Electric charging stations)
येणारा काळ फक्त इलेक्ट्रिक वाहनांचाच असणार हे निश्चित. आणि देशातील दिग्गज Hero Electric ने त्यासाठी तयारी सुरू केली आहे. हिरो इलेक्ट्रिक भारतात १ लाख EV charging station बसवणार आहे.
Hero Electric ने भारतामध्ये 1 लाख EV चार्जिंग स्टेशन स्थापित करण्यासाठी Bengaluru-based EV charging start-up Charzer सोबत भागीदारी केली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी या दोन कंपन्यांनी 3 वर्षांचा कालावधी निश्चित केला असून ते प्रथम 10,000 चार्जिंग स्टेशन सुरू केले जातील. सध्या कंपनीच्या या प्लॅनमध्ये 30 शहरांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामध्ये प्रथम EV charging station सुरू केले जातील.
सर्व स्टेशन्सचा तपशील मोबाईलवर उपलब्ध असेल :- EV charging stations सुरू केल्यानंतर, Charzer कंपनी त्यांना जीपीएस सक्षम ठेवेल. Charzer Mobile App आणि Website द्वारे, कोणतीही व्यक्ती त्यांना शोधण्यात आणि त्यांच्या जवळच्या इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनचे स्थान जाणून घेण्यास सक्षम असेल. मिळालेल्या माहितीनुसार, या 1 वर्षाच्या स्टेशनमध्ये हिरो इलेक्ट्रिक डीलरशिपचाही समावेश केला जाईल आणि कंपनीच्या शोरूम आणि सेवा केंद्रांवर चार्जिंग स्टेशन देखील चालवता येतील.
Hero ची सर्वात स्वस्त Electric Scooter
Hero Electric Flash :- Hero इलेक्ट्रिक फ्लॅश दोन बॅटरी मॉडेल्समध्ये लॉन्च करण्यात आला आहे ज्यामध्ये Lead Acid Battery व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 37,078 रुपये आहे आणि Lithium-Ion Battery ची एक्स-शोरूम किंमत 49,663 रुपये आहे. ही ई-स्कूटर 250W पॉवर मोटरसह येते, ज्याच्या आधारावर ही दुचाकी 25Kmph च्या सर्वोच्च वेगाने चालविली जाऊ शकते.
स्कूटरची LA बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी 8 ते 10 तास आणि LI बॅटरीला 4 ते 5 तास लागतात. Hero Electric Flash LA मॉडेल एका चार्जमध्ये 50KM अंतर कापू शकते. LI मॉडेलची रेंज 85 किमी आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ड्रम ब्रेक, इलेक्ट्रिक स्टार्ट आणि अलॉय व्हील सारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.
Hero Electric Optima :- Hero Electric Optima चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स हीरो इलेक्ट्रिक फ्लॅश सारखीच आहेत परंतु तुम्हाला डिझाइनच्या बाबतीत बरेच बदल पाहायला मिळतील. त्याच्या चाकाचा आकार 16 इंच आहे आणि स्कूटरचा ग्राउंड क्लीयरन्स 140 मिमी आहे.
यात ड्रम ब्रेक, इलेक्ट्रिक स्टार्ट आणि अलॉय व्हील तसेच आकर्षक रंग मिळतात. या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 41,770 रुपये आहे. ही स्कूटर 250W BLDC मोटरसह येते जी 25Kmph चा टॉप स्पीड देते. यात 1.344kWh क्षमतेची बॅटरी आहे जी 8 ते 10 तासांत चार्ज होते आणि एका चार्जमध्ये 50 किमी अंतर कापते.