ऑटोमोबाईल

2023 Tata Harrier : प्रतीक्षा संपली ! टाटाच्या ‘ह्या’ 2 पावरफुल एसयूव्हीसाठी बुकिंग सुरू ; फीचर्स लावणार तुम्हाला वेड

Published by
Ahmednagarlive24 Office

 2023 Tata Harrier : लोकप्रिय ऑटो कंपनी टाटाने ग्राहकांना सुखद धक्का दिला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो कंपनीने एक मोठा निर्णय घेत 2023 Tata Harrier आणि Safari चे बुकिंग सुरु केले आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि देशातील अनेकजण या दिवसाची मागच्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत होते. मात्र अद्याप कंपनीने 2023 Tata Harrier आणि Safari चे किमती जाहीर केलेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार कंपनी पुढील महिन्यात या दोन्ही दमदार एसयूव्हीची किमती जाहीर करू शकते. चला मग जाणून घेऊया ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने 2023 Tata Harrier आणि Safari मध्ये कोणत्या कोणत्या फीचर्स दिले आहे.

ADAS फीचर्स

डार्क रेड एडिशन टाटा मोटर्सच्या हॅरियर आणि सफारी एसयूव्हीच्या अपग्रेडेड मॉडेल्ससोबत येण्याची शक्यता आहे. सध्या या दोन SUV बद्दल सांगायचे झाले तर सध्याच्या मॉडेलनुसार त्यामध्ये अनेक नवीन गोष्टी पाहायला मिळतील. अपडेटेड हॅरियर आणि सफारीला फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग, हाय बीम असिस्ट, ट्रॅफिक साइन रेकग्निशन, लेन डिपार्चर वॉर्निंग, लेन चेंज अलर्ट आणि ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन यासह अनेक विशेष ADAS फीचर्स मिळतील.

360 डिग्री कॅमेरा

2023 टाटा सफारी आणि टाटा हॅरियर कंपनी 360-डिग्री कॅमेरा तसेच पॅनोरामिक सनरूफ, अॅम्बियंट लाइटिंग, 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 7-इंच इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कार प्ले, व्हॉइस कमांडसह अनेक विशेष फीचर्स मिळणार आहे. 6 भाषांमध्ये वॉयस कमांड जे या दोन्ही पावरफुल SUV ला फीचर्सच्या बाबतीत उत्तम बनवतील. नवीन हॅरियर आणि सफारी नुकत्याच लाँच झालेल्या MG हेक्टर फेसलिफ्ट तसेच महिंद्रा XUV700 आणि Hyundai Alcazar सारख्या SUV शी स्पर्धा करेल.

इंजिन

Tata Safari आणि Harrier SUV च्या अपग्रेड केलेल्या मॉडेल्समध्ये पूर्वीसारखेच 2.0-लिटर टर्बो डिझेल इंजिन दिसेल, जे 170hp पॉवर आणि 350Nm पिकअप टॉर्क जनरेट करते. हे 6 स्पीड मॅन्युअल किंवा 6 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये पाहिले जाऊ शकते. सध्याच्या मॉडेलनुसार, 2023 मॉडेल हॅरियर आणि सफारीच्या किमतीत 50,000 ते 1 लाख रुपयांचा फरक दिसू शकतो.

हे पण वाचा :- Budh Gochar 2023: 27 फेब्रुवारीपासून ‘या’ 4 राशींना मिळणार जबरदस्त लाभ ! होणार आर्थिक फायदा ; जाणून घ्या नेमकं कारण

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office