ऑटोमोबाईल

ACE DI 6565 V2 Tractor: 2200 किलोची हायड्रोलिक क्षमता आणि 61 एचपीचा आहे हा पावरफूल ट्रॅक्टर! वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये

Published by
Ajay Patil

ACE DI 6565 V2 Tractor:- कृषी यांत्रिकीकरणाच्या या कालावधीमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात यंत्र वापरले जात असेल तर ते म्हणजे ट्रॅक्टर हे होय. शेतीची पूर्व मशागत ते पिकांची काढणी पर्यंतच्या विविध टप्प्यांमध्ये ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांकडून केला जातो.

तसेच अनेक शेती कामांमध्ये महत्त्वाची असलेली यंत्र ही ट्रॅक्टरचलित असल्याने देखील ट्रॅक्टरचा वापर हा शेतीसाठी महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे प्रत्येक शेतकरी ट्रॅक्टर खरेदी करण्याच्या अगोदर पावरफुल आणि मजबूत अशा ट्रॅक्टरची निवड करण्याला प्राधान्य देतो.

या अनुषंगाने जर तुम्हाला देखील ट्रॅक्टर घ्यायचे असेल व तुम्ही शक्तिशाली ट्रॅक्टरच्या शोधात असाल तर तुमच्याकरिता Ace DI 6565 V2 हे ट्रॅक्टर उत्तम पर्याय ठरू शकते.

Ace DI 6565 V2 ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये

 या ट्रॅक्टरमध्ये चार सिलेंडर डायरेक्ट इंजेक्शन, वॉटर कुल्ड, 4088 सीसी क्षमतेचे नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड  डिझेल इंजन देण्यात आलेले असून ते 61.2 एचपी पावर जनरेटर करते. कंपनीच्या या ट्रॅक्टरमध्ये ड्राय एअर क्लिनर क्लॉजिंग सेंसर प्रकारचे एअर फिल्टर देण्यात आले आहे.

या ट्रॅक्टरचे इंजिन 2200 आरपीएम जनरेट करते. कंपनीचा हा ट्रॅक्टर 65 लिटर क्षमतेच्या इंधन टाकीसह येतो. या ट्रॅक्टरचे हायड्रोलिक क्षमता ही 2200 kg इतकी ठेवण्यात आली आहे व या ट्रॅक्टरचे एकूण वजन 2505 किलोग्राम इतके आहे. तसेच या ट्रॅक्टरमध्ये पावर स्टेरिंग देण्यात आली आहे.

तसेच या ट्रॅक्टरमध्ये 12 फॉरवर्ड+ बारा रिव्हर्स गिअरसह गिअरबॉक्स देण्यात आलेला आहे.Ace कंपनीचा हा ट्रॅक्टर डबल क्लचमध्ये येतो.

कंपनीच्या या ट्रॅक्टरचा फॉरवर्ड स्पीड ताशी 30.85 किमी आणि रिव्हर्स स्पीड 26.22 किमी प्रतितास ठेवण्यात आला आहे. तसेच या ट्रॅक्टरमध्ये दोन व्हिल ड्राईव्ह आहे.

Ace Di 6565 V2 ट्रॅक्टरची किंमत

 या ट्रॅक्टरची भारतात एक्स शोरूम किंमत नऊ लाख 80 हजार ते दहा लाख 50 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच या ट्रॅक्टरची ऑन रोड किंमत आरटीओ नोंदणी आणि राज्यांमध्ये लागू होणाऱ्या रोड टॅक्समुळे बदलू शकते.

Ajay Patil