ऑटोमोबाईल

‘या’ 3 इलेक्ट्रिक कार वर मिळतोय तुफान डिस्काउंट, Mahindra XUV400 EV तर 4 लाखांची सूट

Published by
Ahmednagarlive24 Office

आता डिसेम्बर महिना सुरु आहे. थोड्याच दिवसात जानेवारी येईल अर्थात नवीन वर्ष सुरु होईल. जर या न्यू ईअरला तुम्हाला नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करायची असेल तर एक खुशखबर आहे. या वर्षाच्या शेवटी काही इलेक्ट्रिक कार वर जबरदस्त सूट मिळत आहे. तुम्ही जर महिंद्राचे फॅन असाल तर Mahindra XUV400 EV वर 4.2 लाख रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे.

महिंद्रा आपल्या कारच्या EL Trim वर ही सूट सध्या देतेय. त्यामुळे तुमची जबरदस्त पैसे वाचतील. त्याचप्रमाणे Hyundai कडे देखील एक ऑफर आहे. सध्या या कंपनीच्या Kona EV वर 3 लाख रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. MG Zs EV वर 1 लाख रुपयांपर्यंत आणि MG Comet EV वर 65000 रुपयांपर्यंत डिस्काउंट सध्या तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या मुहूर्तावर कार खरेदी करणे खूपच परवडणार आहे.

आधी जाणून घेऊयात Mahindra XUV400 EV

Mahindra च्या वाहनांचे चाहते खूप आहेत. या कंपनीच्या इलेक्ट्रिक कार देखील खूप डिमाण्डेड आहे. Mahindra XUV400 EV चे तर अनेक चाहते आहेत. सध्या इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये कंपनीची ही एक उत्तम एसयूव्ही कार आहे. लवकरच या कार ची नवीन अपडेटेड व्हर्जन देखील येत आहे. XUV400 EV चे बेस मॉडेल 15.99 लाख रुपयांत येते.

तिचे टॉप मॉडेल 19.39 लाख रुपयांपर्यंत जाते. यामध्ये 34.5 kWh आणि 39.4 kWh असे दोन बॅटरी सेटअप आहेत. ही एसयूव्ही 10 कलर ऑप्शनमध्ये येत असून यात 378 लीटरची बूट स्पेस आहे. एकदा पूर्ण चार्ज झाली की साधारण 456 किमी ही कार जाते असे म्हटले जाते. 50 kW DC फास्ट चार्जरने चार्ज केले तर ही एसयूव्ही 50 मिनिटांत 80 टक्के चार्ज होते. Mahindra XUV400 EV वर 4.2 लाख रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे.

आता पाहुयात Hyundai Kona

ही एक सुपर स्मार्ट कार असून तिचीही तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ दिसते. या कारची रेंज देखील महिंद्रासारखीच जास्त आहे. साधारण एका चार्जमध्ये 452 किमी पर्यंत कार जाते. Hyundai Kona ही फाईव्ह सीटर कार असून, त्यामध्ये 332 लीटरची बूट स्पेस आहे. ही कार पाच कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. बॅटरीविषयी पाहाल तर कंपनीने यात 39.2 kWh बॅटरी पॅक दिला आहे व तो 136 PS पॉवर आणि 395 Nm टॉर्क जनरेट करते. कारचे बेस मॉडेल 23.84 लाख रुपयांना आहे. Kona EV वर 3 लाख रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे.

MG Comet EV

या कारचे बेस मॉडेल 7.98 लाख रुपयांत उपलब्ध आहे. कारमध्ये फीचर्स देखील अत्यंत उत्तम आहेत. अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, एअरबॅग्ज, ISOFIX चाइल्ड सीट अँकरेज आणि रिव्हर्स पार्किंग कॅमेरा आदी सेफ्टी फीचर्स यात आहेत. MG Comet EV वर 65000 रुपयांपर्यंत डिस्काउंट सध्या तुम्हाला मिळत आहे.

Ahmednagarlive24 Office