5 Star Rating मिळवलेल्या ‘या’ आहेत 9 कार्स! तुमच्यासाठी कोणती राहील बेस्ट?

भारत एनसीएपी 2023 पासून सुरू झाल्यानंतर भारतातील कार सुरक्षिततेसाठी एक नवा मानक ठरली आहे. भारत एनसीएपीने अनेक कार्सला 5 स्टार रेटिंग दिली आहे आणि यामुळे लोकांना सुरक्षितता आणि संरचनात्मक मजबुतीच्या दृष्टीने चांगले पर्याय उपलब्ध झाले आहेत.

Updated on -

5 Star NACAP Rating Car:- भारत एनसीएपी 2023 पासून सुरू झाल्यानंतर भारतातील कार सुरक्षिततेसाठी एक नवा मानक ठरली आहे. भारत एनसीएपीने अनेक कार्सला 5 स्टार रेटिंग दिली आहे आणि यामुळे लोकांना सुरक्षितता आणि संरचनात्मक मजबुतीच्या दृष्टीने चांगले पर्याय उपलब्ध झाले आहेत. येथे आम्ही अशा 10 कार्सची यादी देत आहोत ज्यांना भारत एनसीएपीने 5 स्टार सुरक्षा रेटिंग दिले आहे.

टॉप 5 स्टार रेटिंग कार्ड

स्कोडा किलाक

स्कोडा किलाक ही एक कॉम्पॅक्ट एसयूव्ही असून 5 स्टार रेटिंग मिळवणारी कार आहे. यामध्ये प्रौढ संरक्षणासाठी 30.88/32 गुण आणि बाल संरक्षणासाठी 45/49 गुण मिळाले आहेत.

महिंद्रा XEV 9e

महिंद्राच्या या इलेक्ट्रिक कारला देखील  5 स्टार रेटिंग मिळाले आहे. प्रौढ सुरक्षामध्ये 32/32 आणि बाल सुरक्षामध्ये 45/49 गुण मिळाले आहेत.

महिंद्रा बीई 6

महिंद्राच्या बीई 6 या नवीन मॉडेलला भारत एनसीएपीकडून 5 स्टार रेटिंग मिळाले. यामध्ये प्रौढ सुरक्षा मध्ये 31.97/32 आणि बाल सुरक्षा मध्ये 45-49 गुण आहेत.

महिंद्रा थार रॉक्स

महिंद्राच्या थार रॉक्सला भारत एनसीएपीमध्ये 5 स्टार रेटिंग मिळाले आहेत. यामध्ये प्रौढ सुरक्षा 31.09/32 आणि बाल सुरक्षा 45/49 गुण आहेत.

महिंद्रा XUV 400 EV

महिंद्राच्या इलेक्ट्रिक कार XUV 400 EV ला 5 स्टार रेटिंग मिळाले आहेत. यामध्ये प्रौढ सुरक्षा 30.38/32 आणि बाल सुरक्षा 43/49 गुण मिळाले आहेत.

टाटा कर्व ईव्ही

टाटा कर्व ईव्हीला 5 स्टार रेटिंग मिळालं असून यामध्ये प्रौढ सुरक्षा 30.81/32 आणि बाल सुरक्षा 44.83/49 गुण आहेत.

टाटा नेक्सन

टाटा नेक्सनची सुरक्षितता खूपच प्रभावी आहे आणि या कारला 5 स्टार रेटिंग मिळाले आहे. यामध्ये प्रौढ सुरक्षा 29.41/32 आणि बाल सुरक्षा 43.83/49 गुण मिळाले आहेत.

टाटा पंच ईव्ही

टाटा पंच ईव्ही देखील 5 स्टार रेटिंग मिळवणारी एक कार आहे. यामध्ये प्रौढ सुरक्षा 31.46/32 आणि बाल सुरक्षा 45/49 गुण मिळाले आहेत.

महिंद्रा एक्सयूव्ही 3एक्सओ

महिंद्राच्या XUV 3XO या कारला देखील 5 स्टार रेटिंग मिळाले आहे. यामध्ये प्रौढ सुरक्षा 29.36/32 आणि बाल सुरक्षा 43/49 गुण मिळाले आहेत.

या सर्व गाड्यांनी 5 स्टार रेटिंग मिळवले आहेत आणि त्यांना लोखंड आणि पोलादाने भरलेले आहे. या गाड्या त्यांच्या उच्च सुरक्षा रेटिंग आणि शक्तिशाली संरचनेसाठी ओळखल्या जातात. जर तुम्ही सुरक्षितता आणि इतर महत्वाच्या वैशिष्ट्यांचा विचार करत असाल तर तुम्ही या यादीतील कोणतीही कार निवडू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!