Maruti Suzuki Brezza EV : वाढत्या पेट्रोलच्या किमती पाहता ऑटो मार्केटमध्ये रोज एक नवीन इलेक्ट्रिक वाहन लॉन्च होत आहे. यामुळे इलेक्ट्रिक मार्केटमध्ये स्पर्धा देखील वाढली आहे. मार्केटमध्ये रोज नव-नवीन इलेक्ट्रिक वाहने लॉन्च होत असतानाचं मारुती देखील आपली नवीन इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
मारुती आजपासून नव्हे तर अनेक वर्षांपूर्वी भारतीय बाजारपेठेत लोकांसाठी आपली आलिशान मोटारगाडी बनवत आहे. या कंपनीवर देखील ग्राहकांचा खूप विश्वास आहे. आपल्या ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासाठी कंपनी नेहमीच प्रयत्नशील दिसते. अशातच आता ही कंपनी बाजाराच्या मागणीनुसार आपली नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही मार्केटमध्ये आणण्याच्या तयारीत आहे. चला तर मग मारुतीच्या या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये काय खास असेल? जाणून घेऊया.
तुम्हाला माहितीच असेल, मारुतीने काही वर्षांपूर्वी सीएनजी आवृत्तीमध्ये मारुती सुझुकी ब्रेझा बाजारात लॉन्च केली होती. आता कंपनी त्याचेच इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये रूपांतर करून बाजारात आणणार आहे. ज्याचे नाव Maruti Suzuki Brezza EV असणार आहे. या इलेक्ट्रिक एसयूव्हीचा फोटो देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यासोबतच या इलेक्ट्रिक कारमध्ये तुम्हाला संपूर्ण 550 किमीची धनसू रेंज पाहायला मिळणार आहे. जी त्यामध्येच खूप खास गोष्ट आहे.
Maruti Suzuki Brezza EV वैशिष्ट्ये
या इलेक्ट्रिक SUV मध्ये एवढी लांब रेंज मिळण्यामागचे कारण म्हणजे यामध्ये वापरण्यात येणारा सर्वात मजबूत बॅटरी पॅक आहे, जो बॅटरी पॅकमध्ये 60kwh क्षमतेच्या लिथियम आयनचा समावेश करण्यात आला आहे. यासोबतच या इलेक्ट्रिक कारमध्ये तुम्हाला 320 लीटरची मोठी बूट स्पेस पाहायला मिळते. या SUV च्या माध्यमातून तुम्ही खडकाळ रस्त्यावरही आरामदायी प्रवासाचा आनंद घेऊ शकता. कारण यामध्ये तुम्हाला आतापर्यंतची सर्वोत्तम सस्पेन्स प्रणाली दिली जात आहे.
Maruti Suzuki Brezza EV किंमत
ही इलेक्ट्रिक एसयूव्ही भारतीय बाजारपेठेत कधी लॉन्च होईल, याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण एका रिपोर्टनुसार, ती पुढच्या वर्षी बाजारात येऊ शकते असे म्हंटले जात आहे. यासोबतच आपण त्याच्या किमतीबद्दल बोललो तर त्याची सुरुवातीची किंमत सुमारे 15 लाख रुपये असू शकते.