ऑटोमोबाईल

7 Seater Car: ‘ही’ आहे मारुती सुझुकीची खिशाला परवडणारी 7 सीटर कार! बोलेरो आणि स्कॉर्पिओला जाल विसरून

Published by
Ajay Patil

7 Seater Car:- भारत हा देश एक कुटुंब पद्धतीच्या दृष्टिकोनातून अनेक बाबींना महत्त्व देणारा देश असून भारतामध्ये अजून देखील मोठ्या प्रमाणावर एकत्र कुटुंब पद्धती आपल्याला ग्रामीण भागात पाहायला मिळते. त्यामुळे जास्तीत जास्त कुटुंबातील सदस्य बसू शकतील अशी 7 सीटर कार घेण्याला बऱ्याच ग्राहकांकडून पसंती दिली जाते.

यामुळे भारतीय बाजारामध्ये अनेक नामवंत कार उत्पादक कंपन्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे सात सीटर एसयूव्ही आणि एमपीव्ही गाड्या सादर केलेल्या आहेत. प्रत्येक कारचे वेगवेगळे असे वैशिष्ट्ये असून किमती देखील वेगवेगळे आहेत. त्यामुळे ग्राहक त्यांना परवडेल व उत्तम मायलेज देईल अशी सात सीटर कार विकत घेण्याचा प्लान करतात.

तसे पाहायला गेले तर या उपलब्ध असलेल्या सात सीटर कारपैकी मारुती सुझुकीची एर्टिगा एमपीव्ही कार ग्राहकांच्या खिशाला परवडणारी आणि या सेगमेंट मधील सर्वात जास्त विक्री होणारी कार ठरली आहे. आकडेवारी पाहिली तर गेल्या महिन्यामध्ये एर्टिगाचे तब्बल 14888 युनिट विकले गेले आहेत व वार्षिक आधारावर या कारची विक्री 65 टक्क्यांनी वाढली आहे.

यावरून आपल्याला या कारचे महत्त्व दिसून येते.जर आपण मार्च महिन्याचा विचार केला तर टॉप 10 सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीमध्ये मारुतीची एर्टिगा आणि महिंद्राची स्कार्पिओ हे दोन मॉडेल्स पुढे आहेत. वार्षिक आधारावर विक्रीतील वाढ टक्केवारीत पाहिली तर स्कार्पियोला ७२ टक्के व एर्टीगाला 65 टक्के वार्षिक वाढ मिळाली आहे.

 सहा महिन्यात मारुती एर्टिगाचे विकले गेले 85 हजार 80 युनिट

जर आपण गेल्या सहा महिन्यातील मारुतीच्या एर्टिगा या कारचा विक्रीचा आलेख बघितला तर ऑक्टोबर 2023 मध्ये 14209 युनिटची विक्री झाली होती. मात्र नोव्हेंबर मध्ये 12857 युनिट विक्रीसह थोडी घट पाहायला मिळाली. नंतर जानेवारी 2024 मध्ये पंधरा हजार एकोणवीस युनिट आणि फेब्रुवारीमध्ये 15042 युनिटची विक्री झाली

व मार्च 2024 मध्ये 14888 युनिट या कारचे विकले गेले. असे एकूण ऑक्टोबर 2023 ते मार्च 2024 असे सहा महिन्याचा कालावधीतील विक्री पाहिली तर ती तब्बल 85 हजार ऐंशी युनिटची विक्री झाली. यावरून आपल्याला अंदाज लावता येतो की ही कार ग्राहकांच्या पसंतीला उतरताना दिसून येत आहे.

 कसे आहे मारुती एरटिगा कारचे इंजिन?

देशातील सर्वात जास्त विकली जाणारी कार असून ही 7 सीटर कार आहे. ही कार पेट्रोल आणि सीएनजी अशा दोनही प्रकारच्या इंजिन पर्यायांमध्ये सध्या उपलब्ध असून ती एक एमपीव्ही कार आहे. या कार मध्ये 1.5 लिटर पेट्रोल इंजन देण्यात आलं असून हे इंजिन माईल्ड हायब्रीड टेक्नॉलॉजीसह सुसज्ज आहे. यातील इंजन 103 पीएस पावर आणि 137 एनएम टॉर्क जनरेट करते. तसेच सीएनजी पर्याय असलेली कार 26 किमी पर्यंतचे मायलेज देते.

 किती आहे या कारची किंमत?

मारुती एर्टिगा ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी सात सीटर कार असून या कारची किंमत आठ लाख 64 हजार रुपयांपासून सुरू होते.

Ajay Patil