Tata SUV Car Discount Offer : टाटा मोटर्स ही देशातील एक नामांकित ऑटो कंपनी आहे. ही भारतीय कंपनी आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नेहमीच नवनवीन ऑफर घेऊन येत असते. दरम्यान, जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात टाटा कंपनीची नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
विशेषता ज्यांना टाटा कंपनीची SUV खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टाटा कंपनीने या चालू मे महिन्यात आपल्या अनेक गाड्यांवर बम्पर डिस्काउंट ऑफर आणली आहे.
या यादीत कंपनीच्या ICE मॉडेल, इलेक्ट्रिक मॉडेलचाही समावेश आहे. टाटा सफारी आणि टाटा हॅरियरवर देखील मोठा डिस्काउंट दिला जात आहे. यामुळे जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात यापैकी एखादी SUV तुमच्या दारात उभी करण्याच्या तयारीत असाल तर तुम्हाला स्वस्तात ही गाडी खरेदी करता येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीच्या माध्यमातून या दोन्ही SUV वर 1.25 लाख रुपयांचे डिस्काउंट दिले जात आहे. पण ही ऑफर फक्त 2023 च्या मॉडेलसाठी राहणार आहे. ज्यांना 2024 चे मॉडेल खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी कोणतीच ऑफर नाहीये. दरम्यान आता आपण टाटा सफारी आणि टाटा हॅरियर 2023 मॉडेलवर कंपनीच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या या डिस्काउंट ऑफरची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कशी आहे डिस्काउंट ऑफर? :- कंपनीने सांगितल्याप्रमाणे, सफारी आणि हॅरियरवर या चालू मे महिन्यात 1.25 लाख रुपयांचा डिस्काउंट मिळू शकणार आहे. या डिस्काउंट ऑफर बाबत बोलायचे झाल्यास, कंपनी यात 75,000 रुपयांची रोख सूट आणि 50,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देत आहे.
ही डिस्काउंट ऑफर दोन्ही SUV गाडीसाठी लागू राहणार आहे. म्हणजे ग्राहकांना ही गाडी खरेदी करताना 75 हजार रुपयांचा कॅश डीस्काऊंट आणि ५०००० रुपयांचा एक्सचेंज बोनस असा एकूण एक लाख 25 हजार रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे.
जर एखाद्या ग्राहकाने या दोन्ही ऑफरचा फायदा घेतला तर त्याला वर एकूण 1.25 लाख रुपयांची सूट मिळणार आहे. कंपनी ADAS तंत्रज्ञानासह स्वयंचलित व्हेरियंटवर सर्वाधिक सूट देत आहे. त्याचवेळी, नॉन-एडीएएस हॅरियर आणि सफारीवर केवळ 1 लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे.
हॅरियरची एक्स-शोरूम किंमत 15.49 लाख ते 26.44 लाख रुपये आहे आणि सफारीची किंमत 16.19 लाख ते 27.34 लाख रुपये आहे. या ऑफरचा लाभ ३१ मे पर्यंतच मिळणार आहे. म्हणजे जर तुम्हाला या ऑफरचा फायदा घ्यायचा असेल तर या चालू महिन्यातच गाडी खरेदी करावी लागणार आहे. पुढल्या महिन्यात ही ऑफर सुरू राहणार नाही.