MG Hector Discount Offer : आपलीही एक स्टायलिश कार असावी असे अनेकांचे स्वप्न असते. मात्र गाड्यांच्या किमती अलीकडे खूपच वाढल्या आहेत. यामुळे अनेकांचे कार खरेदीचे स्वप्न देखील लांबणीवर पडले असल्याचे दिसत आहे.
आता मात्र कार खरेदी स्वस्त होणार आहे. कारण की वेगवेगळ्या कंपन्या आपल्या लोकप्रिय गाड्यांवर डिस्काउंट ऑफर आणत आहेत. दरम्यान जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात MG या कंपनीची एसयुव्ही कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
कारण की MG ने देखील आपल्या एका लोकप्रिय SUV कारवर एक बंपर डिस्काउंट ऑफर काढला आहे. खरेतर कंपनीच्या माध्यमातून त्यांच्या सर्वच गाड्यांवर डिस्काउंट दिले जात आहे. पण, कंपनी आपल्या MG Hector या लोकप्रिय SUV वर सर्वाधिक डिस्काउंट ऑफर करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या गाडीच्या खरेदीवर ग्राहकांना तब्बल अडीच लाख रुपयांची सूट मिळणार आहे. तथापि ही ऑफर केवळ 2023 च्या मॉडेलवर राहणार आहे. 2024 च्या मॉडेल वर ही सूट राहणार नाही. 2024 च्या मॉडेलवर डिस्काउंट ऑफर आहे मात्र तो डिस्काउंट ऑफर यापेक्षा कमी आहे.
दरम्यान आता आपण एमजी कंपनीकडून 2023 च्या मॉडेलवर दिली जाणारी ही डिस्काउंट ऑफर नेमकी कशी आहे याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कशी आहे ऑफर
मिळालेल्या माहितीनुसार, 2023 हेक्टर डीजल-मैनुअल (शाइन 5 STR / स्मार्ट 5 STR / स्मार्ट 7 STR) या गाडीवर स्पेशल डिस्काउंट एक लाख वीस हजार रुपये, लॉयल्टी बोनस 20 हजार रुपये, एक्सचेंज डिस्काउंट एक लाख रुपये, कॉर्पोरेट डिस्काउंट दहा हजार रुपये अशी जास्तीत जास्त अडीच लाख रुपयांची डिस्काउंट ऑफर राहणार आहे.
तसेच 2023 च्या हेक्टर पेट्रोल-मैनुअल/ऑटोमैटिक (ऑल वैरिएंट्स) या गाडीवर स्पेशल डिस्काउंट एक लाख वीस हजार रुपये, लॉयल्टी बोनस 20 हजार रुपये, एक्सचेंज डिस्काउंट 75 हजार रुपये, कॉर्पोरेट डिस्काउंट दहा हजार रुपये असे एकूण दोन लाख 25 हजार रुपये डिस्काउंट म्हणून मिळणार आहेत. शिवाय, 2023 च्या हेक्टर डीजल-मैनुअल (ऑल वैरिएंट) गाडीवर देखील जास्तीत जास्त दोन लाख 25 हजार रुपयांची डिस्काउंट ऑफर दिली जात आहे.