ऑटोमोबाईल

भारतीय बाजारात लवकरच लॉन्च होणार नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ! कारसारखा 10.25 इंचीचा टच स्क्रीन डॅशबोर्ड सह मिळणार ‘हे’ भन्नाट फिचर्स

Published by
Ahmednagarlive24 Office

Upcoming Electric Scooter : इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे.

जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याच्या प्लॅनमध्ये असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची राहणार आहे.

खरे तर अलीकडे भारतीय बाजारात इलेक्ट्रिक वाहनांना विशेष मागणी आली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमती यामुळे सर्वसामान्य नागरिक इलेक्ट्रिक स्कूटर वापरायला विशेष पसंती दाखवत आहेत.

पेट्रोल स्कूटर वापरण्याऐवजी इलेक्ट्रिक स्कूटर वापरायला अधिक पसंती मिळत आहे. विशेष म्हणजे भारतीय बाजारात अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केल्या आहेत.

अशातच आता भारतीय बाजारात ताईवानच्या ऑटोमोबाईल कंपनीकडून एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली जाणार असे वृत्त समोर आले आहे.

गोगोरो कंपनी लवकरच गोगोरो पल्स (Gogoro Pulse) ही इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही गाडी तीन सेकंद मध्ये 0 ते 50 किलोमीटरचा स्पीड पकडते.

तथापि या गाडीची रेंज किती राहणार याबाबत कोणतीच माहिती समोर आलेली नाही. मात्र ही गाडी जून 2024 पर्यंत सर्वसामान्यांसाठी लॉन्च केली जाणार अशी बातमी समोर येत आहे. दरम्यान आता आपण या गाडी विषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कशी राहणार डिझाईन

या अपकमिंग इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये मॅट्रिक्स एलईडी हेडलाईट दिले जाणार आहेत. हेडलाईट क्लस्टर मध्ये 13 समांतर एलईडी युनिटचा समावेश राहणार आहे.

गोगोरो पल्समध्ये एअर-कूल्ड हायपर ड्राइव्ह H1 मोटर राहणार आहे, जी लिक्विड-कूल्ड सिस्टमने सुसज्ज राहील असा दावा करण्यात आला आहे.

ही मोटर 11,000 rpm वर 9 किलोवॅट पॉवर वितरीत करण्यास सक्षम राहणार आहे. ही स्कूटर फक्त 3.05 सेकंदात 0 ते 50 किमी/ताशी पर्यंत स्पीड पकडणारा असा दावा करण्यात आला आहे.

सुरक्षिततेसाठी, स्कूटरमध्ये ट्रॅक्शन कंट्रोलचे वैशिष्ट्य आहे आणि राइडिंगसाठी, रेंज, डर्ट, सिटी, टूरिंग, ट्रॅक आणि कस्टम असे 6 मोड देखील उपलब्ध राहणार आहेत.

यामुळे या गाडीने आरामदायी प्रवास करता येणार आहे. कंपनीच्या इतर गोगोरो मॉडेल्सच्या विपरीत, त्याची सीट थोडी लहान राहणार आहे.

त्याच वेळी, फूटपेग बॉडी पॅनेलमध्येवच मॅच होत आहेत. या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये 10.25 इंच टच स्क्रीन असलेले डॅशबोर्ड दिले जाणार आहे.

याशिवाय या गाडीमध्ये अनेक महत्त्वाचे आणि भन्नाट फीचर्स राहणार आहेत. या गाडीच्या किमती बाबत बोलायचं झालं तर याची किंमत दोन लाख रुपयांच्या आसपास राहणार असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.

Ahmednagarlive24 Office