Alcazar Facelift SUV : ह्युंदाई मोटर्सकडून आगामी काळात त्यांच्या नवनवीन कार लॉन्च केल्या जाणार आहेत. अलीकडच्या काळात ह्युंदाई मोटर्सने त्यांच्या लोकप्रिय क्रेटा एसयूव्ही कारचे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च करण्यात आले आहे. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
ह्युंदाई मोटर्स आता Alcazar एसयूव्ही कारचे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. कारण ह्युंदाई मोटर्सकडून Alcazar फेसलिफ्ट एसयूव्ही कारची चाचणी घेण्यात येत आहे. Alcazar फेसलिफ्ट एसयूव्ही कार चाचणी दरम्यान दिसून आली आहे.
फॅमिलीसाठी नवीन 7 सीटर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी Alcazar फेसलिफ्ट एसयूव्ही कार तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते. ह्युंदाई मोटर्सकडून लवकरच त्यांची Creta N Line एसयूव्ही देखील लॉन्च केली जाईल.
ह्युंदाई Alcazar फेसलिफ्ट डिझाईन
ह्युंदाई मोटर्सकडून Alcazar फेसलिफ्ट एसयूव्ही कारचे डिझाईन आणखी आकर्षक बनवले जाणार आहे. Alcazar फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये ड्युअल टोन रंग पर्याय पाहायला मिळेल. कारमध्ये 360-डिग्री कॅमेरा देखील दिला जाईल. Alcazar ला नवीन ग्रिल, LED DRLs आणि एक अपडेटेड बंपर दिला जाईल.
Alcazar फेसलिफ्ट वैशिष्ट्ये
Alcazar फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मोठी इन्फोटेनमेंट स्क्रीन, पॅनोरॅमिक सनरूफ, फ्रंट पार्किंग सेन्सर्स, 360-डिग्री कॅमेरा आणि वायरलेस चार्जर अशी अनेक मानक वैशिष्ट्ये दिली जातील. तसेच ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, लेव्हल 2 ADAS सूट, अनुक्रमिक टर्न इंडिकेटर, एसी फ्रंट-सीट्स देखील दिली जातील.
Alcazar फेसलिफ्ट
Alcazar फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये 1.5-लीटर टर्बो-पेट्रोल आणि 1.5-लीटर डिझेल इंजिन पर्याय दिले जाण्याची शक्यता आहे. कारचे हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल, 7-स्पीड DCT आणि ऑटोमॅटिक टॉर्क कन्व्हर्टरशी जोडलेले असेल.