ऑटोमोबाईल

कुटुंबासाठी सुरक्षित कार खरेदी करण्याचा विचार करत आहात का? तर ‘या’ आहेत 34 किमी मायलेज देणाऱ्या व 5 स्टार रेटिंग असलेल्या सेफ्टी कार

Published by
Ajay Patil

Budget Car Under 10 Lakh Price:- कार खरेदी करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते व नवीन कार विकत घेण्याअगोदर काही गोष्टींची काळजी घेणे तितकेच गरजेचे असते. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती काळजी घेतच असतो. महत्त्वाचे म्हणजे यामध्ये कार घेताना असलेला बजेट आणि त्या बजेटमध्ये आपल्याला कशी कार मिळत आहे किंवा आपल्याला कोणती वैशिष्ट्ये असलेले कार हवी आहे हा देखील एक महत्त्वाचा विचार केला जातो.

वैशिष्ट्यांचा विचार केला तर यामध्ये कारमध्ये असलेली सेफ्टी फीचर्सचा प्रामुख्याने विचार केला जातो. कारण कुटुंबाच्या सुरक्षेकरिता सेफ्टी फीचर्स असलेली कार खूप महत्त्वाची ठरते. तसेच कारचे मायलेज व इतर अनेक गोष्टी पाहिल्या जातात.

आज जर आपण भारतीय कार बाजारपेठेचा विचार केला तर आपल्याला अनेक लोकप्रिय अशा कंपन्यांच्या वेगवेगळी वैशिष्ट्य असलेल्या कार दिसून येतात. त्यामुळे बऱ्याच जणांचा कार निवडीमध्ये गोंधळ उडतो.

या अनुषंगाने तुम्हाला जर कार घ्यायची असेल व सेफ्टी कार घेण्याकडे तुमचा कल असेल व बजेट हा दहा लाखाच्या आत असेल व त्यामध्ये तुम्हाला चांगली कार हवी असेल तर या लेखामध्ये आपण तीन कार्सची माहिती बघणार आहोत ज्या सेफ्टीच्या बाबतीत देखील उत्तम आहेत व मायलेज तसेच इतर वैशिष्ट्ये व दहा लाखाच्या आत बजेटमध्ये मिळतात.

या आहेत उत्तम सेफ्टी रेटिंग आणि मायलेज असलेल्या कार

1- टाटा कर्व्ह- टाटा मोटर्सची ही एक उत्तम कार असून ही कंपनीची एसयूव्ही सेगमेंटमधील कार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बघितले तर या कारला NCAP क्रॅश टेस्टिंगमध्ये पाच स्टार मिळाले आहेत. या कारमध्ये फ्रंट एअर बॅग, साईड हेड एअरबॅग, साईड चेस्ट एअर बॅग, मागच्या बाजूला आयसोफिक्स,

सीट बेल्ट रिमाइंडर यासारखे सेफ्टी फीचर्स देण्यात आलेले आहेत. तसेच टाटा कर्व्ह ईव्ही व्यतिरिक्त या कारच्या पेट्रोल व्हेरिएंटला भारत एनसीएपी क्रॅश टेस्टिंगमध्ये 5 स्टार रेटिंग देखील मिळाले आहे. या कारची एक्स शोरूम किंमत नऊ लाख 99 हजार रुपये आहे.

2- महिंद्रा XUV 3XO- महिंद्रा अँड महिंद्राची ही सर्वात सेफ्टी कार असून या कारला भारत एनसीएपी क्रॅश टेस्टिंगमध्ये देखील चांगले स्टार मिळाले आहेत. या कारमध्ये 1.2- लिटर टर्बो पेट्रोल इंजिन दिले असून जे 96kW पावर आणि 200 एनएमचा पिक टॉर्क जनरेट करणे सक्षम आहे.

इतकेच नाही तर या कारचे थर्ड 1.5- लिटर टर्बो डिझेल इंजिन 86Kw ची पावर आणि 300 एनएमचा टॉर्क जनरेट करते. हे दोन्ही प्रकारची इंजिन मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येतात. ही कार 21.2 किलोमीटर पर लिटरचे मायलेज देते. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बघितले तर या कारमध्ये लेवल दोन एडीएएस, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम,

ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग सिस्टम, सहा एअर बॅग, सर्वात मोठा सनरूफ आणि त्यासोबत 360 डिग्री कॅमेरा यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत. या कारची एक्स शोरूम किंमत सात लाख 79 हजार रुपये आहे.

3- मारुती सुझुकी डिजायर- मारुती सुझुकीच्या माध्यमातून नुकतीच नवीन डिझायर लॉन्च करण्यात आलेली असून या कारला क्रॅश टेस्टिंगमध्ये पाच स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. या नवीन डिझायर मध्ये 1.2- लिटर पेट्रोल इंजिन असून इंजिन ८२ पीएस पावर आणि 112 एनएम पीक टॉर्क जनरेट करण्यासाठी सक्षम आहे.

तसेच हे इंजिन पाच मॅन्युअल आणि पाच ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह कनेक्ट आहे. तसेच या कारच्या सीएनजी पावरट्रेन व त्यासोबत पर्यायी हायब्रीड पेट्रोल केवळ पाच फीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह उपलब्ध असेल. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बघितले तर या नवीन डिझायरमध्ये सहा एअर बॅग देण्यात आलेले आहेत.

याशिवाय या कारमध्ये तीन पॉईंट सीट बेल्ट, EBD, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम,ESP, हिल होल्ड असिस्ट तसेच रिवर्स पार्किंग सेन्सर इत्यादी सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. या कारची किंमत बघितली तर ती सहा लाख 79 हजार रुपयांपासून ते दहा लाख 14 हजार रुपये पर्यंत आहे.

Ajay Patil